
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा नगर परिषद कार्यालयात १७ सप्टेंबर रोजी ७४ वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, स्वामी रामानंद तीर्थ या महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करून लोहा न.पा.चे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व त्यानंतर सामुदायिकरीत्या राष्ट्रगीत घेण्यात आले.
यावेळी लोहा न.पा.चे मुख्याधिकारी गंगाधर पेंटे, उपाध्यक्ष दत्तात्रय वाले ,गट नेते करीम शेख , नगरसेवक केशवराव मुकादम, नगरसेवक जीवन पाटील चव्हाण, नगरसेवक संदीप दमकोडावांर ,नगरसेवक नबी शेख , नगरसेवक केतन खिल्लारे,
नगरसेवक अमोल व्यवहारे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक कृ. भा. जाधव, कार्यालयीन अधीक्षक उल्हास राठोड , यांच्या सहित सर्व कर्मचारी लोहा शहरातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार बांधव व्यापारी, श्री संत गाडगे महाराज विद्यालयाचे सर्व विद्यार्थी आदी उपस्थित होते
यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बी.डी. जाधव सर यांनी केले.