
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-नाव जरी बच्चू असलं;तरी काम करण्याची इच्छाशक्ती प्रबळ.अचलपूर-चांदूरबाजार मतदारसंघात २०० कोटींचा निधी खेचून आणणारे आ.बच्चू कडू सध्या आपल्या मतदारसंघाच्या विकास कामांकरिता चर्चेत आहेत.अचलपूर-चांदूरबाजार मतदारसंघातील विकास कामांकरिता वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत व विशेष अनुदान अंतर्गत “२००कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ पंधरवड्याला सुरवात झाली आहे.आ.बच्चू कडू यांच्या अथक प्रयत्नातून सद्यस्थितीत चालू असलेल्या विकासकामांच्या शुभारंभामुळे विरोधकांना मोठा धक्का बसला आहे.
रक्तदान असो वा दवाखाना,अपंग असो वा वृद्ध सामान्य जनतेचेच्या कामांसाठी मतदारसंघातचं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आ.बच्चू कडू नावाजलेले आहेत.चांदूरबाजार येथील प्रभाग क्रमांक १ ते ८ चे विकासकामे,नगरपरिषद शाळांचे विकासकामे,उद्यान विकासकामे,शहरातील भाजीपाला विक्रेते तसेच किरकोळ विक्रेत्यांसाठी मिरची मार्केट येथे डोन शेडचे बांधकाम,बेलोरा चौक येथे वाहनांकरिता भूमीगत पार्किंग व्यवस्था,प्रभाग क्रमांक ७ मध्ये ऑडिटोरियम (नाट्यगृह) तसेच एक्सिबेशन गॅलरीचे बांधकाम तसेच मतदारसंघातील कुरळपूर्णा,फुबगाव,सर्फाबाद,हिरुळपूर्णा,कोतगावंडी,धानोरा पूर्णा,रांजना पूर्णा,दहिगाव पूर्णा,कृष्णापूर,लसणापूर,जगन्नाथपूर,विरुळपूर्णा,आसेगाव पूर्णा,टाकरखेडा पूर्णा,तळणीपूर्णा,तामसवाडी,हैदतपुर,जमापूर,शिराजगाव बंड,आखतवाडा,जैनपूर,प्रल्हादपूर,अबदलपूर-इमामपूर,मिरजापूर,नजरपूर,बोरज,नानोरी,हिरापूर,माधान,दिलालपूर येथील विकासकामांच्या शुभारंभाचा पहिला टप्पा आ.बच्चू कडू यांनी पूर्ण केला आहे.