
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रा प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
सिरसी :- पुनर्वसन सिरसी ते गणेश मंदिर पेठवडज दरम्यान अचानक झालेल्या पावसामुळे सिरसी येथील पुल वाहून गेला असून या पुलावरून जाणाऱ्या दोन शेळ्या पुराच्या पाण्यासोबत वाहून गेल्या आहेत शेतकरी व्यंकटी जाधव यांनी प्रशासनाकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. तसेच वाहून गेलेला पुल बांधून देण्यासाठी प्रशासनाला विनंती केली आहे. पाऊस अचानक आल्यामुळे पुर भयानक आला होता या पुरासोबत पुलाचे पाईप सुध्दा वाहून गेले आहेत.झालेले आर्थिक नुकसान शासनातर्फे देण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांने केली आहे.