
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:- भूम ते साबळेवाडी रस्त्यांच्या कामांचा श्रीफळ फोडून श्रीगणेशा शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. मा.नगराध्यक्ष,विकासरत्न संजय गाढवे यांनी भूम ते साबळेवाडी रस्त्याची मागील काही दिवसांपूर्वी पाहणी करून लवकरात लवकर पक्का रस्ता करण्याचे आश्वासन दिले होते. मागील अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झालेली असून त्यामुळे या शिवारातील शेतकऱ्यांना पावसाळ्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.मात्र आता शेतकऱ्यांचा हा त्रास मा.संजय गाढवे यांच्या माध्यमातून संपणार असून हा रस्ता पक्क्या स्वरूपाचा होणार आहे.त्या अनुषंगाने सदरील रस्त्याचे काम आज शेतकरी श्री मधुकर शेंडगे,मधुकर पौळ यांच्या हस्ते श्रीफळ फोडून सुरू करण्यात आले.यावेळी श्री कल्याण साबळे,अनिल साबळे,दत्ता साबळे,रवींद्र दुगम,पिंटू साबळे,राहुल शेंडगे,शिवाजी शेंडगे,आप्पा साबळे,प्रभाकर शेंडगे,सुनील साबळे,सुरज गाढवे,दादा गाढवे,संतोष गाढवे यांच्यासह या भागातील सर्व शेतकरी उपस्थित होते.