
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये नेहमी अग्रेसर असणारे सामाजिक कार्यकर्ते मा. वाजिद शेख यांच्या कार्याची दखल घेत आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्याच्या भोसरी विधानसभा संघटक पदी निवड करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल त्यांचा सत्कार ज्ञानदेव उत्तम शिंदे ओबीसी युवा नेते महाराष्ट्र , मंगेश मारनोरे, शेखर शेमाडे ,विजय तुपे , प्रवीण निकम , प्रकाश दाभाडे, ज्योतीराम साळुंखे , अजित शेख , महेंद्र प्रजापती, सोपान मोरे,समीर पठाण साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.
आम आदमी पक्षाने जी माझ्यावर जबाबदारी टाकलेली आहे ती जबाबदारी मी स्वेच्छेने निष्ठापूर्वक पक्षाची ध्येय धोरणे बांधील राहून माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा न जाता पक्ष वाढीसाठी आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी करीन असे या वेळी नवनिर्वाचित संघटक वाजिद शेख यांनी सांगितले.