
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे
देगलूर: गोरेगाव तालुक्यातील भडंगा ग्रामपंचायत येथे गावकऱ्यांच्या उपस्थितीत नव्याने तंटामुक्ती समितीचे गठन करण्यात आले. यात नवनिर्वाचित तंटामुक्ती समितीच्या सर्व सदस्यांचे गावकऱ्यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. या नव्याने गठीत करण्यात आलेल्या तंटामुक्ती समितीचे अध्यक्षपदी राजकुमार राऊत यांची निवड करण्यात आली. तंटामुक्ती समितीतील पदाधिकारी याप्रमाणे सीमा नंदेश्वर निमंत्रक देवेंद्र दमाये पत्रकार, शारदा उईके सरपंच ,उमाकांत मोरे उपसरपंच, लीलावती सोनवणे ,सुषमा खोब्रागडे, विलास बडोले, शामराव नंदेश्वर, बबीता टेंभुर्णीकर ,कटरे सर, संगीता घारपिंडे ,धनीराम बावनकर ,चिंतामण राऊत ,रूपलाल पटले, पवन मानकर, सुरेश भोयर, डोंगरे सर पोलीस स्टेशन गोरेगाव , धमगाये मॅडम तलाठी, बागडे मॅडम यांचे समावेश करण्यात आले.