
दैनिक चालू वार्ता लोहा प्रतिनिधी -राम कराळे
उमरा :- लोहा तालुक्यातील उमरा येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी कंधार-लोहा विधानसभा सदस्य लोकप्रिय आमदार श्री. श्यामसुंदर शिंदे साहेब यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी भेट घेऊन आशिर्वाद घेतला. यावेळी आमदार साहेबांनी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी नवनिर्वाचित सदस्य तथा लोहा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन श्री. स्वप्नील पाटील उमरेकर व श्री. संदीप पाटील उमरेकर, श्री. सचिन पाटील उमरेकर यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते.