
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -दादासो वाक्षे
आटपाडी – (कामत) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामथ येथे आज या गावात आनंदीबाई मुंबई मानखुर्द व त्यांचे सहकारी यांनी गावात फेरफटका मारत असताना या शाळेतील चिकित्सक असणारे शिक्षक नानासाहेब झुरे यांनी प्रशालेचे मुख्याध्यापक शिवाजी गळवे व सहकारी शिक्षक शहाजी वाक्षे व अंबुरे सर यांच्याशी चर्चा करून आजपर्यंत मानव जातीत स्त्री व पुरुष या दोनच जाती प्रामुख्याने मानल्या जात असतात. परंतु ज्यांच्या नशिबी तृतीयपंथी म्हणून निसर्गाने शिक्का पाडलेला असतो. अशा मानव असूनसुद्धा माणुसकी पासून दुरावलेला घटक शिवाय अनेकांचा चेष्टेचा बनलेला विषय यांच्या बद्दल सहानुभूतीची भावना समाजात निर्माण व्हावी. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून चला जपूया माणुसकी ! या उपक्रमा अंतर्गत या पाहुण्यांना आपल्या प्रशालेत निमंत्रित करून त्यांचा यथोचित मानसन्मान करून गौरविण्यात आले. यामुळे खरोखरच उपस्थित पाहुणे सुद्धा भावनावश झाले .कारण त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की आज पर्यंत आम्ही म्हणजे समस्त मानव जातीत काही उनाड व टवळखोरांचा चेष्टेचा विषय ! शिवाय अनेक जण आम्हाला अनेक वेळा हिणवतात तरीसुद्धा निसर्ग दत्त देणगी असल्याने आम्ही स्वाभिमानाने समाजात वावरत असतो .परंतु आज या प्रशालेने आम्हाला बोलावून सन्मानित केलं .हा आमच्या आयुष्यातील पहिलाच प्रसंग व तो ऐतिहासिक आहे असे भावोदगार काढले .खरोखर या प्रशालेच्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच आहे असेही त्यांनी जाता जाता सांगितले.