
दैनिक चालू वार्ता माजलगांव प्रतिनिधी-संभाजी गोसावी
बीड जिल्ह्यातील माजलगाव धरणामध्ये बुडलेल्या डॉक्टरचा शोध घेताना मच्छीमारांच्या जाळ्यांत अडकल्यांने कोल्हापूरचा आपत्ती व्यवस्थापक पथकांतील जवान राजशेखर प्रकाश मोरे (वय३०) यांचाही करुन अंत झाला. माजलगांव धरणामध्ये पाहण्यांसाठी गेलेल्या डॉक्टर दत्ता फपाळ यांचा काल सकाळी बुडून मृत्यू झाला. मृतदेह बाहेर काढण्यासाठी कोल्हापूरहून एनडीआरएफची टीम बोलविण्यांत आली होती या पथकांतील जवान राजशेखर मोरे यांचा समावेश होता. कोल्हापूरच्या केडीआएफ टीम मधील शुभम काटकर व राजशेखर मोरे या दोघांनी ऑक्सीजन सिलेंडर घेवुन पाण्यांमध्ये उडी मारली मात्र १५ मिनिटांनी दोघांपैकी कर्मचारी असलेला शुभम काटकर यांना बीडच्या पथकांने तत्काळ बाहेर काढले आणि माजलगांव शहरांतील एका खाजगी रुग्णालयांत उपचारांसाठी दाखल केले. बेपत्ता झाल्यानंतर बच्चावासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू होते मात्र प्रयत्न फोल ठरला पाण्याखाली बेपत्ता जवानाला स्थानिक मच्छीमार महिलांनी गळ लावून वर काढले धरणकाठी जवानांची तपासणी करुन बचाव पथकांतील डॉक्टरांनी कोल्हापूरचे जवान राजशेखर मोरे यांना मृत घोषिंत केले. जवान राजशेखर यांच्या पाठीवरील ऑक्सिजन सिलेंडर बाजूला गेल्यांने मृत्यू झाल्यांची शक्यता वर्तविण्यांत आली आहे. माजलगांव धरणात डॉ.फपाळ सर यांना शोधण्यासाठी आलेल्या कोल्हापूरचा राजशेखर मोरे सर यांना आपले कार्य करीत असताना त्यांनी आपला जीव गमावला माजलगावांसाठी आपले कार्य करण्यासाठी आलेला शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी माजलगांव जनतेतून एक मदतीचा हात हा उपक्रम हाती घेतला आहे.