
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
बीड : वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांचे
हिंदुत्वाचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेना ‘हिंदू गर्व गर्जना’ यात्रेनिमित्त आज बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमास उपस्थित
राहून संबोधित केले.
मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे ज्वलंत विचार पुढे नेत आहे. धर्मवीर आनंद दिघेसाहेबांनी दिलेल्या शिकवणीनुसार जनसामान्यांच्या हितासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात वंदनीय बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न झाला. शिवसेना वाढवणाऱ्या, पक्षासाठी खस्ता खाल्ल्येल्या, संघर्ष केलेल्या सामान्य शिवसैनिकांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात न्याय मिळत नव्हता. त्यामुळेच अशा सरकारमधून बाहेर पडायचा निर्णय मा. एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने घेतला. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही वंदनीय बाळासाहेबांच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या मार्गाने जात आहोत. मा. एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार जनसामान्यांच्या सेवेसाठी कायम तत्पर आहे. अनेक जनहिताचे निर्णय आपले शिवसेना-भाजप युतीचे सरकार घेत आहे. तसेच मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत सच्चा शिवसैनिकाला कायमच न्याय मिळालेला आहे व मिळत राहील हा विश्वास आहे.
यावेळी आमदार मा.मंत्री सुरेश आण्णा नवले, आमदार श्री.ज्ञानराजजी चौगुले, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, महिला आघाडी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.