
दैनिक चालू वार्ता नांदेड प्रतिनिधी – प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
नांदेड – श्री शिवाजी प्रार्थमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय माणिक नगर नांदेड अंतर्गत क्रांती सहकारी कर्मचारी मर्यादित पतसंस्था नांदेड ची स्थापना 24 सप्टेंबर 1980 साली झाली असून या पतसंस्थेची सर्वसाधारण 42 व्या वार्षिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष क्रांती सहकारी कर्मचारी मर्यादित पतसंस्था नांदेडच्या चेअरमन सुधीर भाऊ कुरुडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समितीचे सदस्य ए.पी.कुरुडे , शालेय समिती नवनिर्वाचित उपाध्यक्ष
सूर्यकांत कावळे तसेच शालेय समिती सदस्य इंद्रजीत बुरपल्ले प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दिलीप वाडेवाले व पर्यवेक्षक पंढरीनाथ काळे , श्री आहेर सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
42 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे
1 ) सर्वप्रथम स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांना व शुरसैनिक हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करणे
2 ) 41 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचन करणे ते कायम करणे 3 ) दिनांक 31 मार्च 2022 अखेर संपणाऱ्या सहकारी वर्षाचे संस्थेचे जमा / खर्चाचे/ बेरीज पत्रक / नफा तोटा पत्रक / ताळेबंद पत्रक वाचन करून त्यास मंजुरी देणे
4 ) सन 2021 – 22 अखेर सहकार वर्षातील संस्थेच्या सभासदांना 2% या दराप्रमाणे लाभांश वाटपास मान्यता देणे व 8% या दराप्रमाणे ठेवीच्या रकमेवर व्याज वाटपास मंजुरी देणे
5 ) संस्थेत नवीन सभासद करून घेणे
6 ) सेवानिवृत्तीमुळे सभासदत्व सोडू इच्छिणाऱ्या सभासदांना मंजुरी देणे
7 ) सन 2021 – 22 या सहकार वर्षातील कमी अगर जास्त झालेल्या खर्चास मंजुरी देणे व पुढील वर्षाच्या सन 2022 – 23 या अंदाजपत्रकास मान्यता देणे 8 ) सन 2021- 22 या सहकार वर्षातील संस्थेचे ऑडिट रिपोर्टरचे अहवाल वाचन करणे त्यातील दोष दुरुस्ती अहवाल व नमुन्यात पाठवणे व मंजुरी देणे
9 ) मोहम्मद निसार मोहम्मद अब्दुल रऊफ प्रमाणित लेखापरीक्षक यांची सन 2020 – 23 या सहकार वर्षासाठी संस्थेचे लेखा परीक्षक म्हणून नियुक्तीस मान्यता देणे
10 ) नूतन कार्यकारणी मंडळाचे अभिनंदन करणे ऐनवेळी अध्यक्षाच्या पूर्वपरवानगीने येणाऱ्या नवीन विषयावर चर्चा करणे व निर्णय घेणे इत्यादी विषय सर्वसाधारण वार्षिक सभेमध्ये घेण्यात आले.
याप्रसंगी क्रांती सहकारी कर्मचारी मर्यादित पतसंस्थेचे चेअरमन सुधीर भाऊ कुरुडे व सचिव श्री सुशील कुरुडे यांनी पतसंस्थेचा पूर्ण अहवाल सर्व सभासदांच्या समोर मांडला आणि क्रांती सहकारी कर्मचारी मर्यादित पतसंस्था श्री शिवाजी हायस्कूल माणिक नगर नांदेड ला ” अ ” दर्जा मिळाल्यामुळे सर्व सभासदांनी संस्थेचे व संस्थेचे चेअरमन तथा सचिव तसेच कार्यकारी संचालक मंडळाचे सर्व सदस्यांनी अभिनंदन केले या सर्वसाधारण सभेला पतसंस्थेचे सर्वच सन्माननीय सदस्य उपस्थित होते सर्वसाधारण सभेची सुरुवात वंदे मातरम या गीतांजली आणि सांगता राष्ट्रगीताने झाली सूत्रसंचालन डॉक्टर किती मॅडम यांनी केले. पतसंस्थेच्या सर्व सभासदांना अतिथी उपहारगृह शिवाजीनगर नांदेड येथे स्वादिष्ट व रुचकर भोजनाचाआस्वाद घेण्याची व्यवस्था करण्यात आली होती