
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी सातारा-संभाजी गोसावी
सातारा. जि. दहिवडी पोलीस ठाण्यांमध्ये नव्यांने पदभार स्वीकारलेले मा. अक्षय सोनवणे साहेब यांनी तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगांवकर यांच्याकडूंन पदभार स्वीकारला. श्री. सोनवणे साहेब यापूर्वी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यांमध्ये आपले कर्तव्य बजावत होते. त्यांच्याकडे बरड पोलीस दूरक्षेत्रांचा कार्यभार सोपविला होता. त्यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यांमध्ये काम करत असताना सराईत गुन्हेगारांच्या चांगल्याच मुसक्या आवळल्या होत्या. आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यांत उत्कृंष्ट आणि कर्तव्यदक्ष कामकाज पाहिले. तसेच श्री. सोनवणे यांची ओळख म्हणजे सिंघम अधिकारी आणि पोलीस प्रशासनांमध्ये शिस्तप्रिय अधिकारी अशी त्यांची पोलीस प्रशासनामध्ये चांगलीच ओळख आहे. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत असताना त्यांच्या उत्कृंष्ट कामगिरीबद्दल त्यांना वेळोवेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल यांच्या हस्ते विविध प्रशासक पत्रक देवुन त्यांना गौरविण्यांत आले होते. दहिवडी पोलीस ठाण्यांचे नूतन साहेब पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि पत्रकार श्री. पुरीगोसावी यांचा गेले दोन वर्षापासून चांगलाच परिचय आहे. दहिवडी पोलीस ठाण्यांत अक्षय सोनवणे यांची बदली होतात श्री. पुरीगोसावी यांनी त्यांचे सोशल मीडियावरुन आणि आज समक्ष सदिंच्छा भेट घेवुन साहेबांचे त्यांनी कौतुक करीत दहिवडी पोलीस ठाण्यांत मध्ये भव्य स्वागत करीत पत्रकार श्री. पुरीगोसावी यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी कोरेगांव ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय गणेश केंद्रे साहेब यावेळी उपस्थित होते यांच्या उपस्थिंतीमध्ये पत्रकार श्री. पुरीगोसावी यांनी श्री. सोनवणे साहेबांच्या फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यांच्या हद्दीमधील कामगिरीबद्दल थोडक्यांत मनोगत व्यक्त केले.