
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:देगलूर शहरात प्रमुख वक्ते सर्व धर्मगुरुच्या मार्गदर्शनाने जमीअत उलमा-ए-हिंद द्वारा सदभावना संसद शान्ति, प्रेम, सदभाव, भाईचारा करिता मोठया हर्षोल्हासात संपन्न झाली.
या कार्यक्रमाची सुरूवात डॉ. सुनील जाधव यांनी सारे जहाँ से अच्छा हिन्दुस्ता हमारा गीत गाऊन झाली. त्यांनी गीता द्वारा राष्ट्रीय एकात्मता, शान्ति, सर्व धर्म समभाव, प्रेमाचा संदेश दिला.या प्रसंगी सर्व धर्मगुरू, प्रमुख अतिथी, प्रमुख उपस्थित मान्यवरांचा सम्मान केला.उपस्थित प्रमुख वक्ते सर्व धर्मगुरू मधे ब्रह्मा कुमारी विद्या बनजी देगलुर सेवा केंद्र संचालिका, शिवानंद शिवाचार्य महाराज तमलुर, सिध्द दयाल शिवाचार्य महाराज बेटमोगरा, शंकर लिंग शिवाचार्य महाराज हणेगाव, ह.भ .प. शरद महाराज मिर्जापुर, हणमंत महाराज कंठालीकर, बाबा जसविंदरसिंघ जी गुरुद्वारा प्रबंधक वन्नाळी, भन्तेजी रेवत बौद्धी देवगाव फाटा, रेव. नागनाथ सुर्यवंशी, अब्दुल मजीद खान जमाते इस्लामे हिंद नांदेड आदि सर्व धर्म गुरुनी ईश्वर अल्लाह एकच आहे व आपण सर्व भाऊ भाऊ असून आपल्या मधे फुट निर्माण करणाऱ्या विरुद्ध एक होउन शान्ति, प्रेम, सद्भावना, आदर ठेवावा व मजहब नही सिखाता आपस मे बैर रखना हिन्दी है हम, हिंदुस्ता हमारा यावर आमल करून शान्तिने, एकोप्याने सर्व धर्माने राहायचे हा संदेश दिला.सद्भावना संसद महाराष्ट्र अध्यक्ष मुहम्मद नदिम सीद्दीकी यांच्या अध्यक्षते खाली झाली. या वेळी प्रमुख अतिथी तहसिलदार राजाभाऊ कदम, पी. आय. सोहन माछरे तर प्रमुख उपस्थिती आमदार जितेशजी अंतापुरकर, मराठवाडा उपाध्यक्ष खारी मुहम्मद असअद सहाब, मौलाना मुहम्मद उस्मान फैसल खासमी, नांदेड, मुफ्ती मोहम्मद खालिद शाकीर सहाब, नांदेड, माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिर्शेटवार, लक्ष्मीकांत पदमवार, शिवसेना तालुका अध्यक्ष महेश पाटील, संभाजी ब्रिगेड शहर उपाध्यक्ष डॉ. सुनील जाधव, बहुजन वंचित आघाडी डॉ. इंगोले उत्तम, मुफ्ती इम्रान खासमी, डॉ. मुंडे विनायक, डॉ. जनार्दन भुमे, शेतकरी नेते कैलास येसगे, डॉ. मुजीब, विविध धर्माचे, राजकिय पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, ज्येष्ठ नागरीक, डॉक्टर्स, वकील, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता मोठय़ा संख्या ने उपस्थित होते.हा कार्यक्रम मोठय़ा हर्षोल्हासात संपन्न झाला. सूत्र संचालन डॉ. बरकतउल्ला सर यांनी केले. कार्यक्रम सफल करण्यासाठी मूख्तरोद्दिन रफाई तालुकाध्यक्ष यांच्या सोबत मुफ्ती अहेमद खान, मुफ्ती रफिक, काझी सय्यद लायक अली, डॉ. मुजीब आदी ने परिश्रम घेतले.