
दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
=====================
अहमदपुर
येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता राजेंद्र पवार यांना नुकताच उत्कृष्ट अभियंता पुरस्कार प्रदान करण्यात आला असून सदरील पुरस्कार जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या हस्ते देण्यात आला आहे.
राजेंद्र सोपानराव पवार यांचे मूळ गाव लामजना ता.औसा.जि.लातूर असून या पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग लातूर येथे शाखा अभियंता म्हणून कार्य केले आहे.तेथे हि सन.2018 मध्ये तत्कालीन बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले होते.तसेच सन 2017 ते 2020 या कालावधीत व्हिआयपी विश्रामगृहाचे व्यवस्थापन चांगले केल्या बद्दल तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस , तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री, राज्यपाल यांनी “उत्कृष्ट व्यवस्थापन ” म्हणून गौरव केला होता.
पदोन्नतीने ते “ऊपविभागीय अभियंता” म्हणून जि.प.बांधकाम उपविभाग लातूर येथे सन 2021मध्ये रूजू झाल्या नंतर येथे मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते, जि.प.बांधकाम उपविभागा अंतर्गत 5054,3054 ,शाळा बांधकाम ,शाळा दुरूस्ती चे कामे ई. कामे,ग्रा.पं.अंतर्गत 15 वा वित्त आयोग, ईमारती बांधकाम गुणवत्तेनुसार केली त्यामूळे यावर्षीचा
जिल्हास्तरीय उत्कृष्ट अभियंता हा पुरस्कार राजेंद्र पवार यांना जिल्हाधिकारी बी.पी. पृथ्वीराज यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या सर्व सहकाऱ्यांनी , कार्यालयीन कर्मचारी, सरपंच, ग्रामसेवक, ठेकेदार यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे मी नियोजन बद्ध काम केल्यानेच मला उत्कृष्ट अभियंता पुरस्कार मिळाल्याचेही यावेळी उप अभियंता राजेंद्र पवार यांनी यावेळी सांगितले.
उत्कृष्ट अभियंता पुरस्कार मिळाल्या अहमदपूर तालुक्यासह जिल्ह्यातील अनेकांनी उप अभियंता राजेंद्र पवार यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.