
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
=====================
अहमदपूर–अंधोरी ता अहमदपूर जि.लातूर येथे माता सुरक्षित तर घर सुरक्षित ” मोहीमचे उद्घाटन माजी जि.प. सदस्या सौ. मुद्रीकाताई भिकाणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित भाग्यश्री क्षीरसागर, ग्रा.पं.सदस्या चीलकेवार,कांबळे, आयसीडी सुपरवायजर केंद्रे, आदी महिला उपस्थित होत्या. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. वैद्यकीय अधिकारी डॉ. बालासाहेब बयास साहेब यांनी सदर मोहिमे बाबत मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित सर्व आरोग्य अधिकारी, कर्मचारी, गट प्रवर्तक,अंगणवाडी कर्मचारी, आशा, उपस्थित होते.