
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीतील सातेफळ फाटा येथे एसटी बस क्रमांक एम.एच.१४ बीटी-४४०७ आणि दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना दि.२७ सप्टेंबर २०२२ (मंगळवार) रोजी सकाळच्या सुमारास घडली.
या अपघातात सांगुलवाडा येथील विशाल गोविंद चौधरी याचा जागीच मृत्यू झाला तर प्रतीक राजेश रामटेके हा जखमी झालेला आहे.चांदूर रेल्वे पोलीसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला आहे.