
दैनिक चालु वार्ता प्रतिनीधी- कवि सरकार इ़ंगळी
भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्वस्व समिती महाराष्ट्र अंतर्गत सुजन फाउंडेशन द्वारे दिला जाणारा सुजन भारत पुरस्कार 2022 लातूर येथील कवी गणेश तुकाराम पुंडे यांना जाहीर झाला आहे.
महाराष्ट्रातील एक नामवंत ग्रामीण कवी असणारे गणेश पुंडे यांना या अगोदर अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सदर पुरस्कार रविवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती तथा लाल बहादूर शास्त्री जयंती चे औचित्य साधून प्रितिसंगम
कराड जिल्हा सातारा येथे महाराष्ट्राचे पाहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळ परिसरात समारंभ पूर्वक स्वातंत्र्य सैनिक मा बाबाराव मुठाळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव समिती चे अध्यक्ष मा श्री संपतराव जाधव यांनी दिली. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.