
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- अंजनगाव सुर्जी येथे येणाऱ्या गणपती ब दुर्गोत्सव व राष्ट्रीय कार्यक्रम व इतर सन याकडे पाहता पोलीस उपविभागीय अधिकारी व पोलीस कार्यालय अंजनगाव सुर्जी यांच्या बतीने परिसरात शांतता व सुव्यवस्था नांदावी म्हणून आपल्या कार्यालयाच्या वतीने भरपूर प्रयत्न केले जातात.परंतु मानव समाजातील तसेच सामाजिक व लोकाभिमुख नागरीकांची गर्दी दिसुन येत नाही.शांतता समिती मध्ये परिसरातील समाजाभिमुख नागरीक आमदार,माजी आमदार,नगराध्यक्ष,नगरसेवक,क्रीडा शिक्षक,महाविद्यालयाचे प्राचार्य,वैद्यकीय क्षेत्रात कार्य करीत असलेले सैनिक,वकील,शासन पुरस्कृत प्राप्त नागरीक आणि प्रत्येक समाजातील अध्यक्ष,व्यायाम शाळेचे अध्यक्ष व सचिव तसेच गणपती व दुर्गोत्सब मंडळाचे अध्यक्ष ब कार्यकर्ते,बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष,स्वतंत्र सैनिक,माजी सैनिक बचत गट महिला,अंगणवाडी सेविका व सामाजिक कार्यात नेहमी सहभागी असणाऱ्या महिला,तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी व विद्यार्थीनी,एन.सी.सी. चे विद्यार्थी ब युवा वर्ग,समाजातील राजकीय पक्षाचे अध्यक्ष व कार्यकर्ते,गावातील प्रतिष्ठीत नागरीक ब पत्रकार व वृत्तपत्राचे प्रतिनिधी तसेच व्यापारी वर्ग इत्यादी समाजाभिमुख नागरीकांची शांतता समितीमध्ये नेमणूक करावी शांतता समितीचे सदस्य परिसरातील नागरीकांना लक्षात येईल असे त्यांना ओळखपत्र देण्यात यावे.जेणेकरुन अशा समाजाभिमुख नागरीकांचा गावात शांतता ब सुव्यवस्था बिघडविणाऱ्या नागरीकांवर फरक पडल्याशिवाय राहणार नाही.अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी ब पोलीस अधिक्षक (ग्रामीण) अमरावती यांचे कडे गिरीश लोकरे यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.