
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
कोल्हापूर. जिल्ह्यांमध्ये मागच्या काही महिन्यांत कुणाच्या घटनांमध्ये चांगलीच वाढ होताना दिसून येत आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यांतील प्रमुख शहर असलेल्या कागलमध्ये चारित्र्यांच्या संशयावरुन पत्नीच्या हत्या केल्यानंतर पोटच्या दोन मुलांचाही निर्घण खून करुन नराधम पोलीस ठाण्यांत हजर या तिहेरी हत्याकांड मुळे कोल्हापूर जिल्हा चांगलाच हादरला. मी बायको आणि दोन पोरांना संपवले आहे मला आत घ्या साहेब असे म्हणत नराधम बाप कागल पोलीस ठाण्यांत हजर कागल येथील तिहेरी हत्याकांड मुळे परिसरांत एकच खळबळ उडाली. गायत्री माळी ( वय३०) कृष्णात माळी ( वय १०) आदिती माळी (वय १६) अशी मृतांची नावे आहेत. तर प्रकाश बाळासो माळी (वय३६) असे या नराधम बापांचे नाव आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडूंन मिळालेल्या माहितीवरुन प्रकाशा कागल शहरांमध्ये पूर्वी होमगार्ड म्हणून काम करीत होता त्याने ती नोकरी सोडून एका साखर कारखान्यांत तो काम करीत होता. तो कागल शहरांतील कोष्टी गल्लीतून गणेश नगर येथे राहायला आला होता. मंगळवारी प्रकाश आणि पत्नी गायत्री यांच्यात वाद झाला होता त्यांचा हा वाद चांगलाच विकोपाला गेला होता. यात गायत्रीचा गळा आवळून खून केला व मूर्तदेह घरातच लपवून ठेवला. सायंकाळी पाच वाजता मुलगा कृष्णा शाळेतून घरी आला तेव्हा प्रकाश हा बाहेरच्या खोलीत बसला होता कृष्णा आतील खोलीत गेल्यावर त्याला आई जमिनीवर पडलेली दिसली आईला उठविण्यांचा प्रयत्न केला पण ती काय हालत नव्हती. आपल्या वडिलांनी आईसोबत काहीतरी केले हे त्याच्या चांगलेच लक्षांत आले तेव्हा तो जोरजोरात रडू लागला. त्यामुळे संत आपल्याला बापाने कृष्णाचाही गळा आवळून खून केला. सायंकाळीच्या सुमारांस मुलगी आदिती घरी परतली आतील खोलीत आई व भावाचा मृतदेह बघून तिने एकच हंबरडा फोडला मात्र आदित्य लोक गोळा करेल या भीतीने प्रकाशच्या तावडीतून तिने सुटण्याचा प्रयत्न केला मात्र आदिती शेवटी नराधम बापांच्या हाती लागली. त्याने तिच्या डोक्यांमध्ये वरवंटा घातला यामध्ये आदिती रक्ताच्या थारोळ्यांत निपचित पाडल्यावर पुन्हा प्रकाश बाहेरच्या खोलीत येवुन बसला त्यानंतर त्याने पोलीस ठाणे गाठून आपल्या गुन्ह्यांची कबुली पोलिसांना दिली. मात्र तरी देखील कागल पोलिसांनी त्याच्यावर विश्वांस ठेवला नाही अखेर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली यावेळी पोलिसांना तिघांचे मृतदेह रक्तांच्या थारोळ्यांत पडलेले दिसले यावेळी पोलीसही चांगलेच हादरले.कागल पोलिसांकडूंन घटनास्थळीची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह कागल पोलीस ठाण्यांतील अधिकारी व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले तसेच कागल पोलीस ठाण्यांमध्ये या घटनेमुळे चांगलीच गर्दी झाली होती. नराधम बापाला पोलिसांनी ताब्यांत घेतले.