
दैनिक चालु वार्ता खानापुर सर्कल प्रतिनिधि -मानिक सुर्यवंशी
देगलूर: तालुक्यातील वझरगा येथील एका शेतकऱ्याच्या बैलाला विद्युत धक्का बसून बैलाचा जागीच मृत्यू झाला आहे.
सविस्तर वृत्त असे की, देगलूर तालुक्यातील वझरगा येथील शेतकरी व्यंकटराव मारोती जाळणे यांनी आपले दोन्ही बैलांना गावालगत असलेल्या मन्याड नदीकाठी चारवत होते. त्यापैकी एक बैल दुपारी अडीच वाजता पाणी पिण्यासाठी मन्याड नदीकाठी जात होता. परंतु मन्याड नदीकाठी असलेल्या व विद्यूत पुरवठा करणाऱ्या विद्युत पोलच्या तणाव तारेत अचानकपणे विद्युत प्रवाह सुरू झाला होता. त्या विद्युत प्रवाह सुरु झालेल्या विद्युत पोलच्या तणाव तारेस त्या बैलाचा स्पर्श झाल्याने बैलाला जब्बर विद्युत शॉक लागून ७० हजार रुपये किंमतीचा बैलाचा जागेवरच दुर्दैवी मृत्यु झाला आहे. शेतकऱ्यानी महावितरण कंपनी व संबंधित शासनाला जबाबदार धरत मृत पावलेल्या बैलाची किंमत देण्याची मागणी करीत टाहो फोडले आहे.