
दैनिक चालु वार्ता खानापुर सर्कल प्रतिनिधि- मानिक सुर्यवंशी
अखेर मनाचा मोठेपणा सिद्ध देगलुर तालुक्यातील अत्यंत महत्त्वाची समजला जाणाऱ्या नरंगल सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकांमध्ये संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून असल्येल्याअत्यंत चुरशीच्या अशा शेतकरी सन्मान पॅनलच्या प्रमुख तथा गोरगरीब वंचिताचे कैवारी मा.मार्केट कमिटीचे उपाध्यक्ष तथा नरंगल चे माजी सरपंच श्री ताराकांत पाटील नरंगलकर यांचा मोठेपणा अखेर सिद्ध झाला असून, सर्व तन, मन, धनाने गोरगरिबांसाठी सर्वस्व पणाला लावून सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न ताराकांत पाटील यांनी केलेला आज सबंध देगलूर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने पाहिलेला आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या नजरा ताराकात पाटील यांच्या या निर्णयाने आपसूकच आदराने बघत आहेत. चुरशीच्या अशा निवडणुकांमध्ये आजपर्यंतच्या सत्ताधाऱ्याला शह देऊन सर्वसामान्यांना सोबत घेऊन शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ उभे असलेल्या पॅनलचे प्रमुख ताराकांत पाटील यांनी महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या चेअरमन पदी सर्वसामान्य कुटुंबातील अशोकराव संग्राम कत्ते यांची चेअरमन पदी निवड करून व बहुजन समाजातील किरन यादवराव कांबळे यांची व्हाईसचेअरमन पदी निवडणूक करून आपणाला सत्तेचा मोह नाही आपण सर्वसामान्यांसाठी कार्य करत आहोत हे पाटील यांनी त्यांच्या या निर्णयाने सबंध तालुक्याला दाखवून दिलेले आहे. यामुळे तालुक्यातीलच नव्हे तर काँग्रेस पक्षातील जिल्हा पातळी पासून ते तालुका पातळी पर्यंतच्या व सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी माननीय आमदार जितेश भाऊ अंतापुरकर,जिल्हा काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, तालुका काँग्रेसचे पदाधिकारी या सर्वांनी ताराकात पाटील यांच्या निर्णयाचे कौतुक केले असून, अशा नेतृत्वाची येणाऱ्या काळामध्ये नितांत गरज आहे ही भावना सर्वसामान्य नागरिक व तसेच पदाधिकारी यांनी बोलून दाखवली आहे.त्यांच्या या निर्णयाने नरंगल वासियांचे पाटील घराण्याविषयी असलेली निष्ठा व पदापासून दूर राहण्याचा त्यांचा जो निर्णय पुन्हा एकदा सिद्ध झाला असून काम करण्यासाठी पदाची गरज नाही काम करण्याची वृत्ती असावी लागते हे पाटील यांनी दाखवून दिलेले आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक तर होतच आहे परंतु त्यांना भावी कार्याला सुद्धा शुभेच्छा तालुक्यातील सर्व पदाधिकारी सर्वसामान्य नागरिक, गोरगरीब जनता त्यांना शुभेच्छा देत आहेत. चेअरमन पदी विराजमान झालेले अशोकराव कत्ते,व्हाईस चेअरमनपदी किरण यादवराव कांबळे यांनी पाटील यांनी दाखवलेला विश्वास आपण सार्थ ठरवू व कायमस्वरूपी त्यांचे आपण ऋणी राहु ही भावना गावातील सर्व सामान्य नागरिक व सेवा सहकारी सोसायटीच्या निवडून आलेल्या सर्व सभासदांनी बोलून दाखवलेली आहे. झालेला विजय नव्या विचारांच्या नेतृत्वाचा सर्वसामान्य जनतेचा झालेला असून,सेवा सहकारी सोसायटीमध्ये निवडून आलेल्या सर्व विजयाचे श्रेय त्यांनी सेवा सहकारी संस्थांच्या सर्व मतदारांना दिले असून, ज्या ज्या लोकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली त्या सर्वांचे तारंकांत पाटिल यांनी जाहीर आभार मानले आहेत.