दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनीधी – माधव गोटमवाड
आज दिनांक 30 सप्टेंबर शुक्रवार रोजी जि.प.प्रा.शाळा मजरे धर्मापुरी येथे केंद्र स्तरीय शिक्षण परिषद संपन्न झाली. यावेळी अध्यक्ष स्थानी मोहन पाटील पंढरे (शा.व्य.स. आ) होते तर प्रमुख पाहुणे सुधाकर पाटील लोखंडे,
भुजंगराव पाटील पंढरे, शशिकला बाई इंगळे सरपंच ,बाबू पाटील पंढरे, व्यंकटराव पाटील पंढरे, सूर्यवंशी सर( केंद्रप्रमुख ), दगडगावे सर , भालेराव सर ,सौ .देशमुख मॅडम , सूर्यकांत अमलापुरे ,परमेश्वर अमलापुरे, बाळाजी अमलापुरे, केशव इंगळे, केंद्रातील सर्व शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी स्वागत गीतांनी सुरुवात केली, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी भाषणे केले. माननीय केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक दगडगावे सर यांनी विद्यार्थ्यांना बक्षिसे दिले. सूत्रसंचालन सौ दाणे मॅडम यांनी केले.श्री.सुधाकर पाटील लोखंडे यांनी शाळेचे मु.अ.आणि शिक्षक व मुलांचे कौतुक केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री.बेळकोनेसर,श्री.पांचाळ सर,सौ.थगनर मॅडम यांनी खूप परिश्रम घेतले.शेवटी श्री.पांचाळ सरांनी सर्वांचे आभार मानले.
