
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
=====================
अहमदपूर:- दि:- २९/०९/२०२२ रोजी आरोग्य वर्धिनि केंद्र खंडाळी ता.अहमदपूर जि.लातूर अंर्गत नवरात्री निमित्त शासनाने” माता सुरक्षित तर घर सुरक्षित ” हा कार्यक्रम हाती घेतला आहे. डॉ. बयास तसेच डॉ केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य वर्धिनी केंद्र खंडाळी येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ कुंभार,आरोग्य सेवक श्री दराडे,आरोग्य सेविका श्रीमती ठाकूर तसेच आशा कार्यकर्त्या जाधव,बोबडे,दोरवे,पांचाळ, कांबळे,वाघमारे,आदी सह अंगणवाडी कार्यकर्त्या गावोगावी जाऊन परिश्रम घेत आहेत. 18 वर्षावरील सर्व महिला विशेषतः गरोदर माता आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.कार्यक्षेत्रातील सर्व गावे ,वाडी ,तांडे ,वस्ती तील सर्वांची तपासणी करण्यात येत आहे.