
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
केन स्टार किड्स इंग्लिश स्कूल, देवला पुनर्वसन, सेलू येथे शारदीय नवरात्रौत्सव निमित्त शाळेत दांडीया चे आयोजन करण्यात आले होते, यावेळी शाळेतील सर्व चिमुकल्या विद्यार्थी व विद्यार्थिनी या दांडीया मध्ये मोठ्या हिरहिरिने सहभाग घेतला. यावेळी दांडीया नृत्य सादर करणाऱ्या विद्यार्थिनी रंगीबिरंगी वेशभूषा परिधान केली होती. तसेच गरबा नृत्य सादर करणाऱ्या विद्यार्थिनी शेरवानी ड्रेस, तर मुलींनी घागरा ड्रेस परिधान केला होता. तर शाळेतील विद्यार्थीनी अनुष्का इंगोले ही दुर्गा माता च्या वेशभूषेत होती. यावेळी शाळेचे संचालक प्रिंसीपल श्रीराम रेंगे व संचालक कृष्णा गीते यांनी दांडीया खेळणाऱ्या मुलांचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षिका व सर्व कर्मचारी वृंद यांनी मेहनत घेतली होती.