दैनिक चालू वार्ता म्हसळा – प्रतिनिधी अंगद कांबळे
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या दिमाखात आनंदात उत्सव साजरा होत आहे.रोहिणी गावं हें कलेचे माहेर म्हणून प्रसिध्द आहे.त्यातच आबाजी कला वैभव हें नावाप्रमाणेच रायगड जिल्हात,म्हसळा तालुक्या मघ्ये नावाजलेले मंडळ आहे. दरवर्षी मंडळाकडून विविद्ध प्रकारचे देखावे तयार करतात, कित्येक लोक या देखावा बघतच राहतात गेल्या वर्षी या मंडळांनी मुख्य प्रवेशद्वार भल्ला मोठा गज मुख दाखवण्यात आला होता आणि अंबे माते ची आरास जणू काही एकेकाळी गिरगाव मधील जुनी चाळ आणि तेथील जुनी राहणीमान हुबेहूब रेखाटली होती वरील मंडळ या देखाव्यामधून नेहमीच *जनजागृती करीत असतात सामाजिक,शैक्षणिक या देखाव्यातून मांडली जाते* या वर्षी सुद्धा मुख्य प्रवेशद्वार येथे भल्ला मोठा कोंबडा याची हुबेहूब प्रतिमा तयार केली आहे या कोंबड्यांची प्रतिमा काय सांगते तर प्रत्येक दिवस हा आपल्या स्पर्धेसारखा आहे आताच युग हे घड्याळाच्या काट्या प्रमाणे आहे सकाळी उठलो की घड्याळ पाहावे लागते आणि झोपेअगोदर सुद्धा घड्याळ पाहून झोपावं लागत कारण या युग खूप गतीने चालत आहे हे युग संगणक युग आहे.कोंबडा दाखवण्याचा प्रमुख मुद्दा हा आहे की एकेकाळी लोक घड्याळ कमी बघायचं कारण ग्रामीण भागात सकाळ ची सुरवात कोंबड्यांच्या आरोळी ने होत होती तिथून आत मधी गेलो की ती सजावट पाहून मन भाराहून जात आणि अंबेमाते ची आरास जणू काही प्रति पंढरपूर वाटत कीती सुरेख ती सजावट कीती छानसा देखावा आणि ते मंदीर खरच त्या देखाव्यांच वर्णन करणार तितकं कमी आहे या साठी गावातील तरुण युवक तसेच मंडळातील सभासद महिला वर्ग सर्व मनापासून हात भार लावतात आणि ही आरास सजावट बघण्यासाठी बरीच लोक येथे आपली हजेरी लावत असत प्रामुख्यानं अजून सांगावंसं वाटत या नवरात्र मधील होम हवन आणि येथील भंडारा मन समाधानी होत या मधी एकेचि बळ ही व्याख्या दिसून येते सर्वांच्या संगटनेने हे कार्य यशस्वी होते
विसर्जन च्या वेळी गावातील प्रत्येक ग्रामस्थ महिला वर्ग तसेच तरुण वर्ग सर्व विसर्जन सोहळा आनंदाने पार पाडतात या मधी ढोल पथक म्हणजे खालू बाजा आणि नवयुवक यांच्या साठी बेन्जो पथक ते सुद्धा AKV बिट्स या बेन्जो च्या तालावर बेधुंद होऊन नाचतात आणि अंबे माते चा निरोप घेतात
