
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
चापोली : १ ऑक्टोबर हा दिवस जागतिक वृद्ध नागरिक दिवस म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने चापोली येथील संजीवनी महाविद्यालयात विविध उपक्रमाचे आयोजन करून जागतिक वृद्ध नागरिक दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक चंदर तेलंगे हे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक बळीराम सोनटक्के, संस्था सचिव डॉ. भालचंद्र चाटे, संस्था सदस्य मल्लिकार्जुन स्वामी, काशिनाथ गंगापूरे, डॉ. प्रदीप नाईकनवरे, सह आदी उपस्थित होते.
प्रारंभी शिक्षण महर्षी स्व. डॉ. नारायणराव चाटे यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी गावातील जेष्ठ नागरिक वैजनाथ चाटे, वीरभद्र गंगापूरे, शिवकुमार सोनटक्के, प्रा. अ. ना. शिंदे, अलीममिया देशमुख, भुजंगराव होनराव, महानंदा पाटील, वैजनाथ कोठावळे, बाबुराव गुडपल्ले, मल्लिकार्जुन कदम, सुभाष शंकरे, छोटूमियाँ देशमुख, संगप्पा तत्तापुरे, रामचंद्र होनराव, शिवराज कोरे सह आदींचा सत्कार करण्यात आला.
देश व सुसंस्कृत समाज घडवायचे असेल तर समाजातील जेष्ठ नागरिकांच्या अनुभवाचा फायदा तरुणांनी घेतला पाहिजे. जेष्ठ नागरिकांनी जीवनातील चढ उतार पाहिलेले असतात. त्यांची शिकवण समाजासाठी अत्यंत मोलाची ठरते. एखाद्या गावाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्या गावातील जेष्ठ नागरिकांनी युवकांना योग्य मार्ग दाखवला पाहिजे, असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय चाटे यांनी यावेळी प्रास्ताविकात व्यक्त केले.
जागतिक वृद्ध नागरिक दिवस निमित्त संजीवनी महाविद्यालय चापोली, डॉ. नरेंद्र हक्के यांचे धन्वंतरी क्लिनिक व प्राथमिक आरोग्य केंद्रे चापोली यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदाब, मधुमेह व इतर आजार तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचा लाभ नागरिकांनी मोठ्याप्रमाणावर घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संदीप मुंढे यांनी केले तर. आभार संस्था सचिव डॉ. भालचंद्र चाटे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. नारायण खेडकर, प्रा. जितेंद्र कांबळे, प्रा. डॉ. सिद्धेश्वर शेटकर, प्रा. डॉ. विजयकुमार ढोले, प्रा. डॉ. फुलचंद चाटे, प्रा. डॉ. सचिन चोले, ज्ञानेश्वर दुडूरे, लक्ष्मण कोलेवाड, शिवाजी कांबळे, विठ्ठल राउतवाड सह आदींनी परिश्रम घेतले.