
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
रायगड.
जम्मू-काश्मीरमधील दुर्गम भागातील सीमेवर देश सेवा करीत असताना रायगड जिल्ह्यांतील महाड तालुक्यांतील ईसांने काबंळे गावचे शहीद जवान राहुल आनंद भगत वयाच्या (२८) वर्षी त्यांना रविवारी सायंकाळी वीरमरण गती प्राप्त झाली. त्यांच्या पश्चात आई-वडील भाऊ-बहीण पत्नी व एक लहान मुलगा आणि त्यांचे पुतणे असा त्यांचा परिवार होता. त्यांच्या जाण्यांमुळे पत्नीसह व लहान मुलगा यासह संपूर्ण भगत कुटुंबावर दुःखांचा डोंगर कोसळला आहे. भारतीय सैन्यदलांतील शहीद जवान राहुल आनंद भगत हे बुधवार ५ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजता अनंतात विलीन झाले. त्यांची अंत्ययात्रा ईसांने कांबळे येथील राहत्या घरांपासून सकाळी ९ वाजता निघाली. संपूर्ण इसाने कांबळे गावातून अंत्ययात्रा काढण्यांत आली. आपल्या वीर सुपुत्रांला पाहून अनेकांचे डोळे गहिवरून आले. अंत्य यात्रेत महाड पोलादपूर माणगाव तालुक्यांतील युवक, युवती, महिला, पुरुष, माझी सैनिक, शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. स्मशानभूमीत पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवल्यावर अनेकांना अश्रू अनावर झाले. पत्नी, आई , भाऊ, बहीण व आप्तेष्ट यांनी आपल्या जिवलगाचे अंतिम दर्शन घेताना टाहो फोडला.
शहीद राहुल भगत यांच्या अंत्य दर्शनासाठी प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी तथा सहाय्यक अधीक्षक निलेश तांबे, तहसिलदार सुरेश काशीद यांसह सातारा जिल्ह्यांचे जिल्हा प्रतिनिधी संभाजी पुरीगोसावी यांनी सोशल मीडियावरुन आपले दुःख व्यक्त केले करीत. वीर पत्नी मीना भगत यांचे सांत्वन केले. यावेळी तहसील प्रशासन, पोलिस प्रशासन यांनी हजेरी लावली. तसेच इसांने-कांबळे ग्रामस्थांनी रायगड प्रशासनांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. बुधवारी सकाळी १०:३० वाजण्यांच्या सुमारांस शहीद राहुल भगत यांना भडाअग्नी देण्यांत आला. आणि भारत मातेचा वीर सुपुत्र शहीद राहुल भगत अनंतात विलीन झाले.