
दैनिक चालु वार्ता अर्धापूर प्रतिनिधी- मन्मथ भुस्से
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित नांदेड, शंकरराव चव्हाण महाविद्यालय, अर्धापूर ,राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ,नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने व नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका यांच्या सहकार्याने, या शिबिराचे उद्घाटन डॉ.मल्लिकार्जुन करजगी ,संचालक ,राष्ट्रीय सेवा योजना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड. यांच्या हस्ते व या कार्यक्रमास साधन व्यक्ती म्हणून मा. शेख रईस पाशा ,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा अग्निशमन अधिकारी नांदेड शहर महानगरपालिका हे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के. के. पाटील हे होते.याप्रसंगी कार्यक्रमाधिकारी डॉ. रघुनाथ शेटे डॉ. एस.जी.बिराजदार यांची उपस्थिती होती.
या शिबिरास नांदेड जिल्ह्यातील बळीराम पाटील कॉलेज किनवट, एल.बी.एस. कॉलेज धर्माबाद ,राजीव गांधी महाविद्यालय मुदखेड, शरदचंद्र महाविद्यालय नायगाव, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,शंकर नगर , जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय नांदेड, आय टी एम महाविद्यालय नांदेड ,प्रतिभा निकेतन महाविद्यालय नांदेड, इंदिरा गांधी महाविद्यालय नांदेड,सायन्स कॉलेज नांदेड,वसंतराव काळे महाविद्यालय,नांदेड,स्वा. रा. ती.म.वि. नांदेड संकुल आणि जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक व शंकराव चव्हाण महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक असे एकूण 150 स्वयंसेवक या शिबिरात सहभागी झाले होते. एक दिवशीय प्रशिक्षण शिबिरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवकांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांच्या वतीने विविध प्रात्यक्षिक देऊन प्रशिक्षण देण्यात आले. शिबिराच्या समोर प्रसंगी सहभागी शिबिरार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.