
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रा प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
सिरसी :- कंधार तालुक्यातील सिरसी बु येथे दुर्गा माता मंडळाच्या वतीने दुर्गा माता विसर्जन डिजे न वाजवता श्री.रोकडेश्वर भजनी मंडळ यांच्या संगीत भजनाने विसर्जन मिरवणुक काढून भक्तीमय वातावरणात पार पडले आहे. दुर्गा माता मंडळाच्या वतीने डीजेच्या खर्च कमी करुन अन्नदान करून सर्व परिसरात नवीन उपक्रम केला आहे. सर्व गावातील नागरिकांनी दुर्गा माता मंडळाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सदस्य येथील देवीची पुजारी मायाताई नवघरे याचे कौतुक केले आहे.