
दैनिक चालु वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भुम:- शहरात हजरत महंमद पैगंबर यांच्या जयंती निमित्त चाऊस गल्ली, कसबा, गराडा गल्ली, गोलाई चौक, ओंकार चौक, नगरपरिषद समोर ,गांधी चौक येथे तरुणांनी, सामाजिक संघटना व विविध राजकीय पक्षाच्या वतीने दुध वाटप व लहान मुलांना बिस्कीट वाटप तसेच भुम शहरात विविध ठिकाणी सरबत,फळ वाटप करण्यात आले.
यावेळी विविध राजकीय मंडळीच्या वतीने जुलुस मिरवणुकीचा सन्मान करण्यात आला.यावेळी प्रविण रणबागुल वंचित बहुजन आघाडी मराठवाडा उपाध्यक्ष, आबा मस्कर,चंद्रमणी गायकवाड ऑल इंडिया पँथर सेना मराठवाडा कार्याध्यक्ष,रुपेश शेंडगे भूम तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष,रोहन जाधव माजी नगरसेवक उपस्थित होते.
हजरत महंमद पैगंबर यांनी जगाला दिलेला शांतीचा संदेश म्हणजे आपल्या आई वडीलांशी चांगले वागा म्हणजे तुमचे मुले तुमच्याशी चांगले वागतील. तसेच पिडीत व्यक्तिला मदत करावे.
आपसात समझोता घडवुन आणा व आपल्या शेजार्याला त्यांचा आधिकार दया त्यांचा धर्म किंवा जात कोणतीही असो व तसेच त्यांना उपाशी झोपु देउ नका. आपल्या मुलींना चांगल्या प्रकारचे शिक्षण दया कारण तुमची मुलगी नरकात तुमची ढाल बनेल.
मानवतेचा संदेश हजरत महंमद पैगंबर यांनी समाजाला दिला.
जयंती साजरी करण्यासाठी परिश्रम घेणारे आसिफ जमादार , ईस्माइल मोगल,आखतर जमादार,सोहेल मोगल, बुबुकर जमादार,सिराज मोगल, फिरोज शेख , मोईन शेख, आज्जु जमादार , गौस शेख, समीर मोगल, इम्तियाज मोगल, जमीर मोगल, आलीम शेख, शब्बीर सापवाले,सलिम बागवान,खदीर शेख यावेळी असंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होता.