
दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधी :-जब्बार मुलाणी
—————————————-खराडी पुणे : दि 10ऑक्टो
शितोकोन कराटे दो स्पोर्ट असोसियेशन च्या वतीने ऑक्टोंबर दिनांक 08 आणी 09 तारखेला गोल्डन बेल्ट कराटे चॅम्पियनशिप 2022-23 भरवून कराटे खेळाच्या विश्वात शोतोकोन कराटे दो स्पोर्ट असोसियेशन चे फाउंडर व प्रेसिडेंट अमितकुमार ठाकूर यांनी इतिहास रचला.
त्यामध्ये संपूर्ण पुणे जिल्हयातील प्रत्येक शाळेतील मुलांनी स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले.कराटे म्हणजे नक्की काय हे लहान थोर यांच्या मनात बिंबवण्याचा मोठा प्रयत्न शोतोकोन कराटे दो स्पोर्ट असोसियेशन चे फाउंडर व प्रेसिडेंट अमितकुमार ठाकूर यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून केला .
यात बऱ्याच शाळांनी सहभाग नोंदविला त्यात ग्लोबल इंडियन इंटरनेशनल स्कूल, कृष्णा एजुकेशन फौंडेशन संस्कार पब्लिक स्कूल लोहगाव, एस.एन.बी.पी. इंटरनेशनल स्कूल वाघोली, यूनीक इंटरनेशनल प्री प्रायमरी अँड प्राइमरी स्कूल, इम्मनुएल मार्थोमा स्कूल, संस्कृती स्कूल, सिटी इंटरनेशनल स्कूल, ऑक्स्फर्ड वर्ड स्कूल, कॅनवास किड्स स्कूल, स्कॉलर ट्रीस स्कूल , गायत्री इंग्लीश मेडियम स्कूल मोशी, नूरचूरे इंटरनेशनल स्कूल चर्होलि, एस.टी. थॉमस पब्लिक स्कूल, सह्याद्री इंटरनेशनल स्कूल देवाची आळंदी , प्रगती इंटरनेशनल स्कूल, नेउरन लॅबस स्कूल धानोरी, स्पोर्ट्स कराटे अकॅडेमी, श्री चैतन्य टेक्नो स्कूल बावधन, सिटी प्राइड स्कूल मोशी, ब्लोसम पब्लिक स्कूल ताथवडे, लेजेंड स्कूल ऑफ मार्शल आर्ट आदी स्कूल यांनी सहभाग नोंदविला.
यामध्ये पालक, शिक्षक, स्पर्धक, प्रेक्षक असे हजारो लोकांनी आपली उपस्थिती नोंदविली.
विजेत्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक, मेडल, ट्रॉफी यांनी मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले .
कार्यक्रमातील उपस्थित मान्यवर आमदार जगदीश मुळीक, आमदार सुनील टिंगरे, प्रितम खांदवे, गुड पिपल्स फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष विशाल खुणे,दै चालु वार्ता चे प्रतिनिधी जब्बार मुलाणी, जास्मिन मुलाणी, बाळासाहेब कुशाळकर, भरत लांडगे
यांनी कार्यक्रमास उपस्थित राहुन स्पर्धकांचे,मनोबल वाढवला.
सुनील टिंगरे आमदार यावेळी “नियोजक ठाकूर यांच्यी प्रसंशा व्यक्त केली. स्पर्धकास कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यात आली. त्यासाठी स्पेशल डॉक्टर यांची नियुक्ती करून, उच्च प्रतीचे मॅट, स्वच्छ पिण्याचे पाणी,प्रसन्न वातावरण, सोबत कर्तव्यनिष्ठ सोबती असे उत्कृष्ट नियोजनबद्ध स्पर्धेची आखणी केली
आमदार जगदीश मुळीक म्हणाले की “हा खरा आत्मनिर्भर भारत बनविण्याचा प्रयत्न आहे़ आणी तो आपल्या भागातून अमितकुमार ठाकूर यांनी केला या बद्दल यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे़. अमित ठाकूर यांना भविष्यात मी लागेल ते सहकार्य करील तसेच कराटे या खेळासाठी राज्यस्तरीय दर्जा मिळावा यासाठी मी प्रयत्न करीन” असे म्हणाले.
तसेच प्रितम खांदवे यांनी कार्यक्रमात बोलताना म्हणाले की “अमितकुमार ठाकूर आणी त्यांची टीम यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे़. कराटे खेळा बाबतची निष्ठा त्यांच्या मध्ये भरभरून आहे़ या मूळे ते या खेळास न्याय देवू शकतात. आम्ही मिळून हे कार्य असेच पुढे चालु ठेवू” असे ते म्हणाले.
सागर लोखंडे, अक्षय सरोदे यांनी कराटे स्पर्धे साठी विशेष अशी मोलाची कामगिरी केली.