
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
नांदेड – अल्पकाळवधीत आपल्या सामाजिक शैक्षणिक व चळवळीच्या माध्यमातून लोकसेवा करणारे झुंझार क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड अविनाश होळगे यांच्या झुंझार क्रांती सेनेने लोहा तालुकाच नव्हे तर आता नांदेड जिल्ह्यात सुध्दा गरूडझेप घेतलेली दिसत आहे. व युवापिढी हि झुंझार क्रांती सेनेची कार्यप्रणाली पाहुन झुंझार क्रांती सेनेच्या चळवळीत सहभागी होत आहे यामध्ये नुकतीच झुंझार क्रांती सेनेची बैठक कंधार येथे पार पडली यामध्ये
झुंजार क्रांती सेनेच्या नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी रघुनाथ घोडके तर नांदेड दक्षिण तालुकाअध्यक्षपदी मा.मारोती वानखेडे यांची निवड झुंजार क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड अनिल पाटील होळगे व झुंजार क्रांती सेनेचे सचिव गजानन चावरे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले व झुंझार क्रांती सेनेची कार्यप्रणाली येणाऱ्या काळात तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सोपानराव कदम सिध्दार्थ एडके देवानंद सावळे रघुनाथ घोडके मारोती वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.