
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे.
देगलूर:देगलूर तालुक्यातील मौजे कोकलगाव येथील कोकलगाव पाझर तलावाला मंजूर झालेल्या निधीचा दुरुपयोग करून त्या पाझर तलावातील पाळूच्या कामात दिरंगाई करण्यात आले आहे. ७५ व्या अमृत महोत्सवानिमीत्त कोकलगाव पाझर तलाव हे मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेतून घेण्यात आले असून या कामाला सुरुवात इ.स. दि. १२ मे २०२२ ते इ.स.दि. १८ जुलै २०२२ या कालावधीत पूर्ण करण्यात आले होते, या कामाला लागणारे अंदाजीत रक्कम ४१,६१,२६१ रु. एवढे निधी असून या निधीचा वापर याच पाझर तलावाच्या दुरुस्तीसाठी आहे का ? याच पाझर तलावासाठी असेल तर तलावाच्या कामामध्ये अफरातफर का? या तलावाच्या दुरुस्तीची पाहणी कोण करणार? असेच काही प्रश्न उपस्थित होत असून यामोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाली असल्याची चर्चा सुरु आहे.
या कामाची दखल हणेगाव ग्रामपंचायत सरपंच प्रतिनिधी तथा ग्रामपंचायत सदस्य विवेक पडकंठवार तसेच ग्रामपंचायत सदस्य वसंत आडेकर यांनी दखल घेऊन या कामावरील गुत्तेदार व अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता उडवाउडवीचे उत्तर मिळाले. त्यासाठी दैनिक मराठवाडा नेता, दैनिक श्रमिक लोकराज्य या वर्तमानपत्रात या भ्रष्टाचाराचा उघड केला असता त्वरीत या कामाला सुरुवात करण्यात आली होती परंतू या कामात थातूर माथूर करून हे काम पुर्ण केल्याचे या भागातील शेतकरी वर्गात दाखवून दिले, परंतू या थातूरमाथूर केलेल्या कामाच्या दोन तीन दिवसानंतर लगेच त्याच पद्धतीने भेगा पडलेले निदर्शनास आले आहे.