
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे.
देगलूर:नवीन बांधकाम सुरू असलेल्या घरात रात्रीच्या वेळी जुगार खेळणाऱ्या सहा जणांवर कार्यवाही करीत त्यांच्याजवळील तीन हजार १७० रुपये रोख व जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केले. गुत्तीतांडा येथे बुधवारी (ता. १२) रात्री दहाच्या सुमारास मरखेल पोलिसांनी ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील दुधा सोमला जाधव, अविनाश श्रीराम चव्हाण, संजु सखाराम राठोड, संजय टोपा जाधव, सतिश सोपान जाधव, सुनील शिवाजी राठोड (सर्व रा. गुत्ती तांडा) हे सर्वजण दुधा जाधव यांचे बांधकाम सुरू असलेल्या घरासमोर झाडाखाली बसून जुगार खेळतअसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार मरखेलचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, सहायक पोलिस निरीक्षक नामदेव मद्दे, पोलीस कर्मचारी अब्दुल बारी, गजानन जोगपेठे, नारायण येंगाले, चंद्रकांत पांढरे आदींनी या ठिकाणी छापा मारून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळ असलेले जुगाराचे साहित्य व रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. यापूर्वी हणेगावच्या बसस्थानक व मार्केट यार्ड परिसरातून जवळपास दहा जणांना पोलिसांनी पकडले होते. यातील आरोपींकडून सहा हजारांची रक्कम जप्त केली. हा विषय खूपच चर्चेचा ठरला होता. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास जमादार बारी हे करीत आहेत.