
दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधी -विशाल खुणे
विष्णू दहिरे (3rd डॅन ब्लॅक बेल्ट, वाईस प्रेसिडेंट एस. के .एस .ए.,प्रेसिडेंट ऑफ पुणे सिटी कराटे असोसिएशन ऑफ इंडिया, फाउंडर ऑफ व्ही फिटनेस क्लब) यांच्या मार्गदर्शनाखाली गोल्डन बेल्ट कराटे स्पर्धा 2022-23 मध्ये शार्प पेज इंटरनॅशनल स्कूल मधील अनन्या दहिरे, वेदांत हरगुडे, झिकरा अन्सारी ,मायरा अन्सारी, अवनीश पाटील, आदित्य चौधरी या मुलांनी गोल्ड मेडल पटकाविले तर अनुष्का भोसले ,संभव धुमाळ, स्वरा धुमाळ, मधुकर राणे, अगस्त्य चालके, लावण्या भोर ,वृषभ रॉय, क्षितिज काटकर, हिंदवी तांबे, श्रेया जरंगे आणि रोहिणी फुलुमारीकर या विद्यार्थ्यांनी सिल्व्हर मेडल पटकाविले. तसेच ओवी कांचन, स्वरा जाधव, कृतिका भोर, प्रांजल अहिरे, देवराज हरगुडे, शिवतेज गायकवाड या विद्यार्थ्यांनी ब्रांन्झ मेडल मिळवून केसनंद परिसरात एक अनोखा असा विजयी पराक्रम गाजवून दाखवला .
शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना शाळेचे डायरेक्टर संदीप हरगुडे व शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा हरगुडे विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे . तसेच अनेक स्पर्धा परीक्षांना जाण्यासाठी प्रोत्साहित करतात .कार्यक्रमामध्ये त्यांचे कौतुक आणी सन्मान करण्यात आला