
दैनिक चालू वार्ता नांदेड प्रतिनिधी -समर्थ दादाराव लोखंडे
==================================
आज माजी राष्ट्रपती स्व . ए .पी .जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त नांदेड जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालया मध्ये वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते सदर ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन मा श्री निखिल बासटवार जिल्हा सांख्यिकी अधिकारी यांच्या शुभहस्ते करण्यात आले त्या प्रसंगी नांदेड जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री प्रताप सूर्यवंशी. बाळू पावडे. श्रीनिवास इज्जतवार. के एस गाडेकर .संजय पाटील .गजानन कळके. यांच्यासह अनेक विद्यार्थी उपस्थित होते
होतकरू विद्यार्थ्यांनी जिल्हा ग्रंथालयातील पुस्तकांचा वाचनासाठी वापर करून आपल्या जीवनाचे कल्याण करून घ्यावे असे उद्गार उद्घाटन प्रसंगी श्री निखिल बासटवार यांनी व्यक्त केले
नांदेड जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील वेगवेगळ्या ग्रंथांच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेची तयारी करावी असे आव्हान जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रताप सूर्यवंशी यांनी केले