
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी
रायगड जिल्हा पोलीस दलांचे नूतन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आज सायंकाळी मावळते पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्याकडूंन पदभार स्वीकारला. पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांचा दोन वर्षाचा कार्यकाळ रायगड जिल्ह्यांसाठी कर्तव्यदक्ष ठरला. त्यांनी कोरोनाच्या काळातही त्यांची कामगिरी रायगड जिल्ह्यांसाठी उत्कृंष्ट ठरली. रायगड जिल्ह्यांमध्ये अनेक मोठेमोठे गुन्हे उघडकीस आणले व मोकांतर्गत कारवाया केल्या. त्यामुळे रायगड जिल्ह्यांमध्ये कायदा सुव्यवस्था चांगलाच अभावीत राहिला. शुक्रवारी रात्री उशिरा व्यंकटेश भट यांनी स्वतंत्र आदेश जारी करत. सातारा जिल्ह्यांतील खटाव तालुक्यांतील सुपुत्र आणि पोलीस प्रशासनांमध्ये शिस्तप्रिय अधिकारी अशी त्यांची खाती असलेले कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी सोमनाथ घार्गे यांची नियुक्ती करण्यांत आली. नूतन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी यापूर्वी मुंबई अकोला,गडचिरोली नागपूर,श्रीरामपूर इस्लामपूर आदीं ठिकाणी आपल्या कामाची चांगली छाप पाडून कर्तबगार अधिकारी म्हणून त्यांची त्यांनी आपला चांगलाच ठसा उमटवला आहे. त्यानंतर त्यांनी मुंबई येथे डीसीपी म्हणून सेवा बजावली. मुंबई (मरोळ) येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र प्राचार्य म्हणून त्यांची उत्कृंष्ट कामगिरी ठरली. त्यांच्या आतापर्यंतच्या सेवेची दखल घेवुन महाराष्ट्र शासनांने भारतीय आयपीएस पोलीस प्रशासनांत त्यांची आयपीएस आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची चांगलीच ओळख आहे. शुक्रवारी रात्री उशिरा त्यांना बदलीचा आदेश जारी होताच. नूतन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेबांनी रायगड जिल्हा पोलीस मुख्यालयांत हजर होऊन मावळते पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्याकडूंन पदभार स्वीकारला. रायगड जिल्ह्यांचे मावळते पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांची मात्र अद्याप कुठेच नियुक्ती झाली नसल्यांची माहिती समोर आली आहे. यावेळी रायगड विभागांतील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थिंतीमध्ये नूतन पोलीस अधीक्षकांचे स्वागत करण्यांत आले.