
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
पुणे : या विशेष दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. आदरणीय Sharad Pawar साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक त्या शैक्षणिक सुविधा आणि अन्य गरजू गोष्टी वेळोवेळी उपलब्ध करून देऊ, अशी खात्री देतो. पुढची पन्नास वर्ष डोळ्यासमोर ठेऊन विचार करायचा, असं पवार साहेब त्यावेळी सांगत असत. त्या दृष्टिकोनातूनच आपलं काम चाललंय. त्याचाच फळं म्हणून आजच्या घडीला ३० हजारांहून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी विद्या प्रतिष्ठान संस्थेत विविध शैक्षणिक क्षेत्रात शिक्षण घेत आहेत. मोठा शिक्षक वर्ग, प्राध्यापक वर्ग या मुलांना अतिशय जबाबदारीनं शिकवत आहे. ६०० शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा काम करतायेत. कार्यकारी मंडळाच्या १३ सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम पद्धतीनं काम सुरु आहे. पवार साहेबांच्या सूचनेनुसार मोठ्या उद्योजकांचं मार्गदर्शन शिबीर ठेवलं जाईल; जेणेकरून आपले विद्यार्थी आधुनिक जगाच्या बरोबरीनं चालतील. विद्यार्थ्यांना आवडीच्या क्षेत्रात प्रगती करता येईल, तशा पद्धतीच्या पायाभूत सुविधा या संस्थेत उपलब्ध झाल्या पाहिजेत यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत.