
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील जनतेला दिपावलीच्या सणासाठी आनंदाचा शिधा उपलब्ध करुन देण्याच्या कार्यक्रमास लोहा तालुक्यामध्ये सुरुवात करण्यात आली आहे.गोरगरीबांना आनंदाचा सिधा पोहचविण्यासाठी लोह्याचे तहसिलदार व्यंकटेश मुंडे,लोह्याचे नायब तहसीलदार तथा पुरवठा अधिकारी राम बोरगावकर ,गोदामपाल सतिष धोंडगे हे परिश्रम घेत आहेत.लोहा तालुक्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व (A.P.L.) योजनेअंतर्गत एकुण 50182 कार्ड धारकांना प्रतिशिधापत्रिका 1 K.G. रवा,1Kg.साखर,1Kg.चनाडाळ,व 1 लिटर पामतेल असा शिधाजजिन्नसंच केवळ 100रुपयामध्ये स्वस्त धान्य दुकानातून उपलब्ध केला जात आहे. यासाठी पुढील तीन-चार दिवसात तालुक्यातील एकुण 166 स्वस्त धान्य दुकानामधुन पात्र प्रत्येक लाभार्थ्याला आनंदाचा शिधा जिन्नस संच उपलब्ध करून देण्यात येणार आहे.तेंव्हा आनंदाचा सिधा जिन्नस लोहा तालुक्यातील ज्या सिधापत्रीका धारकांना स्वस्तधान्य दुकानदाराकडुन मिळाला नाही अशा सिधापत्रीका धारकांनी रिपब्लिकन सेनेकडे तक्रार करावी. व तक्रार केल्यास आपणास आनंदाचा सिधा जिन्नस पुरवठा विभागाकडुन मिळवुन देण्यात येईल असे आवाहन रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा सदस्य अनिलदादा गायकवाड यांनी लोहा तालुक्यातील सिधापत्रीका धारकांना केले आहे