
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- खोलापूर पोलीस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलीसांनी यासंदर्भात तपास केला असता गुप्तमाहितीवरून खोलापूर पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेवून ३५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलीसांनी आरोपीला विचारपूस केली असता घरफोडी करून चोरी केल्याचे कबूल केले.
अय्याज खां हाफिज खां वय वर्षे २८ रा.कालापत्थर,खोलापूर असे आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध १३२/२२ अन्वये कलम ४५४,३८० गुन्हा दाखल केला.त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा अमरावतीच्या पथकाने तपास केला असता पोलीस पथकाला मिळालेल्या गुप्तमाहितीनुसार अय्याज खां हाफिज खां हा तरबेज चोराने घरफोडी केली.आरोपीच्या कबुली नंतर त्याच्याजवळून ६,१०० रुपयांचे सोने व नगद रक्कम असा एकूण ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल खोलापूर पोलीसांनी जप्त केला.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ,अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तपन कोल्हे,पोलीस उपनिरीक्षक सुरज सुसतकर व त्यांच्या पथकातील सुनिल महात्मे,दीपक सोनाळेकर,अमजत सै. शौकत,उमेश वाकपांजार,निलेश डांगोर,अमोल केंद्रे,संदीप नेहारे यांनी केली आहे.