
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी
सातारा. दिनांक 20: हर घर नल से जल योजनेअंतर्गत प्रत्येक घरात प्रत्येक माणसाला स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी शासन कटिबद्ध असून जल जीवन मिशन योजनेचे काम प्रगतीपथावर आहे अशी माहिती सातारा जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी दिली. सन 2024 सालापर्यंत राज्यातील ग्रामीण भागात प्रत्येक घरात प्रतिमाणसी 55 लिटर शुद्ध पाणीपुरवठा आणि गुणवत्ता पूर्ण पाणी पुरवठा करण्यासाठी शासन कटीबद्ध आहे त्याला अनुषंगून सातारा जिल्हा परिषद देखील प्रगतीपथावर आहे असे प्रतिपादन त्यांनी केले ते पुढे म्हणाले पुढील 30 वर्षाच्या लोकसंख्येच्या अंदाजानुसार जलजीवन मिशनची आखणी करण्यात आली आहे. 50% केंद्र शासनाने 50% राज्य शासन असा खर्च या योजनेवर करण्यात येत आहे. योजना कार्यान्वित झाल्यानंतर योजनेची मालकी आणि देखभाल दुरुस्ती ग्रामपंचायत तर्फे करण्यात येणार आहे या देखभाल दुरुस्तीसाठी 10 टक्के लोक वर्गणी गोळा करून ती ग्रामपंचायतकडेच ठेवण्यात येणार आहे. जल जीवन मिशन योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यात 1777 अंदाजपत्रके तयार करण्यात आली असून १६५१ अंदाजपत्रकांना तांत्रिक मान्यता देण्यात आले आहे 1584 योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे 1530 योजनांची निविदा कार्यवाही करण्यात आली आहे 983 योजनांना कार्यारंभ आदेश देण्यात आले असून 606 योजना प्रगतीपथावर आहेत तर 319 कामे पूर्ण झाली आहेत.
आठ दिवसांत पाटण तालुक्यातील 30, जावळी तालुक्यातील 15, सातारा तालुक्यातील 12, कोरेगांव तालुक्यांतील 9, महाबळेश्वर 7, खटाव तालुक्यातील 6, फलटण तालुक्यातील 3, माण व कराड तालुक्यातील प्रत्येकी २ आणि खंडाळा १ तालुक्यातील 10 तालुक्यांना मिळून 87 प्रशासकीय मान्यता दिले आहेत तर 21 योजनांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती देऊन जिल्हा परिषदेचे नूतन सीईओ श्री.ज्ञानेश्वर खिलारी पुढे म्हणाले की प्रत्येक घरी प्रत्येक माणसाला प्रत्येक कुटुंबाला स्वच्छ आणि शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे हे शासनाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे त्यानुसार शासन कार्य करीत आहे सातारा जिल्हा परिषद त्यासाठी सर्व यंत्रणा सह पूर्ण क्षमतेसह काम करीत आहे गेल्या दोन वर्षात 100 टक्के उद्दिष्ट पूर्ती झाली असून यावर्षीही तशी 100 टक्के उद्दिष्ट पूर्ती होईल असा विश्वास वाटतो.