
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-राणा दाम्पत्यांनी दिवाळी आनंदपूर्वक साजरी व्हावी यासाठी स्वतः पुढाकार घेतला आहे. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा मेळघाटातील गोर-गरीब आणि गरजूंच्या जीवनात दिवाळीचा गोडवा निर्माण करणार आहेत. मेळघाटातील १ लाख गरीब कुटुंबियांना आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा मोफत किराणा वाटप करणार आहे.
‘किराणा किट पॅकिंगचे काम युद्धस्तरावर सुरू असून आदिवासीसंह अमरावतीतील १ लाख गरजू कुटुंबियांच्या घरी मोफत किराणा पोहचवणार असल्याचे’ खासदार नवनीत राणा यांनी सांगितले.
नवनीत राणांनी भरल्या किराणाच्या पिशव्या
आमदार रवी राणा यांच्या गोदामात सध्या किराणाच्या पिशव्या भरण्याचे काम सुरू आहे. कार्यकर्त्यांसह स्वतः खासदार नवनीत राणा यांनी देखील अनेक पिशव्यांमध्ये स्वतःच्या हाताने किराणा भरला.२०० च्या वर कार्यकर्ते किराणा वितरणासाठी सज्ज झाले आहेत.राणा दाम्पत्याच्या वतीने एक लाख गरीब कुटुंबांना साखर,तेल,चनाडाळ,पोहे,मैदा,मुरमुरे,रवा,सोयाबीन वडी,डालडा,मसाले,शेंगदाणे आणि मिठ इत्यादी किराणा मालाचे वितरण केले जाणार आहे.