
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर:दिनांक १९/१०/२०२२ रोजी आयोजित करण्यात आली सदर स्पर्धेचे उद्घाटन श्रीमती संगीता ढाणीवाला, श्रीमती डॉक्टर सान्वी जेठवणी, शुभम बिरकुरे व कामगार कल्याण अधिकारी प्रसाद धस सर यांच्या हस्ते सदर स्पर्धेचं उद्घाटन करून स्पर्धेस सुरवात करण्यात आली या लोकनृत्य स्पर्धेत एकूण दहा संघाने सहभाग नोंदवला त्यामध्ये परभणी, नांदेड,हिंगोली येथील संघाने सहभाग नोंदवून विविध पारंपारिक लोकनृत्य सादर केली सदर स्पर्धा ही ललित कला भवन, लेबर कॉलनी, नांदेड येथील सभागृहामध्ये पार पडली. सदर स्पर्धेचे निकाल वाचन व पारितोषिक वितरण समारंभ लगेचच सायंकाळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती डॉ. सान्वी जेठवणी प्रमूख पाहुणे श्री. गंगाधर डूम्पलवार (निर्देशक आयटीआय,नांदेड) प्रमूख पाहुणे अशोकराव तेरकर (उपअध्यक्ष,जिल्हा क्रीडा असोसिएशन, नांदेड)
श्री. भास्करराव मोरे(सह शिक्षक) तसेच कामगार कल्याण अधिकारी प्रसाद धस या
मान्यवरांच्या हस्ते करन्यातआला. सदर स्पर्धेमध्ये धनगर नृत्य सादर करून प्रथम क्रमांक ललित कला भवन,नांदेड या संघाने पटकावला तर द्वितीय क्रमांक कामगार कल्याण केंद्र,मिल व आदिवासी नृत्य सादर करून तृतीय क्रमांक कामगार कल्याण केंद्र,सिडको नांदेड या संघाने पटकावला विजेत्या संघास धनादेश प्रथम ५०००/- द्वितीय ३०००/- तर तृतीय २०००/- प्रमाणपत्र देऊन यथोचित गौरव करण्यात आला. प्रसंगी सूत्रसंचालन विश्वनाथ साखरे प्रास्ताविक विलास मेंडके व आभार गजानन भोसीकर यांनी मांडले कार्यक्रम यशस्वीतेसाठी मीना कुळकर्णी, एस. आर. फाळके, साईनाथ राठोड, मनीषा काळे, मंदा कोकरे, अरुणा गीरी, ऊषा गवई,नामदेव तायडे यांनी परिश्रम घेतले.