
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
कर्तव्यदक्ष सातारा जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्संल यांची बदली झाली असून. त्यांच्या जागेवर आता गडचिरोली जिल्ह्यांमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असणारे समीर शेख यांनी शनिवारी सकाळी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल यांच्याकडूंन सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल यांनी आपल्या दोन वर्षांपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला होता. दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी मोठमोठे गुन्हे उघडकीस आणले. विशेषता: शंभरहून अधिक गुन्हेगारांना त्यांनी मोक्का लावला तर ७० हो ना देख टोळ्यांना त्यांनी तडीपार केले. तसेच कोरोना कळते त्यांनी उत्तमरीत्या काम केल्यांने त्यांचा राज्य शासनाकडूंन गौरव करण्यांत आला होता. पोलीस वसाहतीचे बांधकाम त्यांच्याच प्रयत्नांने सुरु झाले हे काम आता जवळपास अंतिम टप्प्यांत आले आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी पोलिसांना त्यांच्या वाढदिवसांला सुट्टी देण्यांची प्रथा सुरु केली होती ही परंपरा त्यांनी जिल्ह्यांमध्ये कायम ठेवली. सातारा जिल्ह्यांचे पत्रकार श्री. पुरीगोसावी आणि अजयकुमार बन्संल साहेब यांचा गडचिरोली जिल्ह्यांपासून चांगलाच परिचय होता. गडचिरोली जिल्ह्यामध्ये बंन्सल साहेब कार्यरत असताना साताऱ्यात येण्यापूर्वीच पुरीगोसावी यांनी सोशल मीडियावरुन त्यांचे अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या होत्या. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल साहेबांचे मला नेहमीच सहकार्य मार्गदर्शन मिळाले. तसेच पुरीगोसावी आपल्या कामानिमिंत्त व सदिंच्छा भेट घेण्यासाठी नेहमी पोलीस अधीक्षकांना वारंवार भेटत असायचे. त्यामुळे पुरीगोसावी यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय बन्संल साहेबांबरोबर चांगलाच परिचय झाला होता. दरम्यान सातारचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झालेले समीर शेख हे यापूर्वी साताऱ्यांत अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते त्यामुळे त्यांना सातारा जिल्ह्यांची चांगलीच माहिती आहे. काही वर्षांपूर्वी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या समर्थकांमध्ये सुरुची राडा झाला होता या प्रकरणात दोन्ही गटातील शंभरहून अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यांत आला होता. या प्रकरणाचा तपास त्यावेळी समीर शेख हे स्वता: करीत होते. तसेच पोकसोचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीवर तातडीने कारवाई करावी यासाठी त्यांचे चांगलेच प्रयत्न होते. गणेशोत्सव, ईद दिवाळी या सणांमध्ये जातीय सलोखा राहावा यासाठी त्यांनी जिल्ह्यांत चांगलेच काम केले होते. नूतन पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी आज सातारा जिल्हा पोलीस पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारताच सातारा जिल्ह्यांचे विद्यमान प्रतिनिधी/ पत्रकार संभाजी पुरीगोसावी यांनी पोलीस मुख्यालयांत समीर शेख साहेबांचे स्वागत करीत त्यांना दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा व्यक्त करण्यांत आल्या. यावेळी उपस्थित जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल साहेब उपस्थित होते.यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल साहेब यांच्या कामगिरीबद्दल पुरीगोसावी यांनी विशेष कौतुक करीत नूतन पोलीस अधीक्षकांना बन्संल साहेबांचा कार्यकाळ सातारा जिल्ह्यांसाठी चांगलाच राहिला असे आवर्जून सांगितले. यावेळी जिल्हा प्रतिनिधी पुरीगोसावी यांनी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल साहेबांनाही दिपावालीच्या मंगलमय शुभेच्छा व्यक्त करण्यांत आल्या. यावेळी उपस्थित पोलीस अधिकारी /पोलीस कर्मचारी यांनाही दिपावालीच्या शुभेच्छा श्री. पुरीगोसावी यांनी दिल्या.