
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
**********
परभणी : परभणी जिल्ह्याच्या विधायक विकासाची बागडोर महिला अधिकाऱ्यांच्या हाती सोपवून महाराष्ट्र सरकारने एक वेगळा आदर्श देशाच्या समोर ठेवण्याचा केलेला प्रयत्न केलेला दिसून येत आहे. जिल्हाधिकारी पदी आंचल गोयल,
परभणी जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदाची धुरा राज्याच्या गृहविभागाने रागसुधा आर. यांच्यावर सोपवली असून बिघडलेली कायदा व सुव्यवस्था सुधरवण्याचे प्रयत्न एका महिला रणरागिणीच्या कर्तव्यातून (पुढाकारातून) सिध्दीस नेण्याचा हेतु तसा चांगलाच आहे. मागील काही काला
परभणी शहराची आणखी एक मोठी ओळख म्हणजे येथे कार्यान्वित असलेल्या मराठवाडा कृषी विद्यापीठाची. सन २०१३ मध्ये या विद्यापीठाचे नाव बदलून त्यांचे ‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ’ असे ठेवण्यात आले. या विद्यापीठामध्ये शेतीसंबंधित विविध अभ्यासक्रम घेतले जातात. त्याशिवाय विविध प्रकारचे संशोधन करुन विस्तार शिक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पोहोचविले जातात.
परभणी शहरातील आणखी एक महत्वाचे ठिकाण म्हणजे ‘पारदेश्वर महादेव मंदीर’. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे असलेले शिवलिंग पाऱ्या (Mercury) पासून बनलेले आहे. पारा हा साधारण तापमानामध्ये द्रव स्वरूपात असतो, परंतु हे एकमेव शिवलिंग असे आहे जे स्थायी स्वरुपात असून ते निव्वळ पाऱ्यापासून बनलेले आहे. म्हणूनच या शिवलिंगाला ‘पारद शिवलिंग’ असेही म्हणतात. त्यामुळे हे मंदीर परभणीचे वैशिष्ट्य म्हणून ओळखले जाते. श्रावण महिन्यात या मंदिरात भाविक-भक्तांची प्रचंड गर्दी होत असते. अनेक देवी देवतांच्या प्रतिमा सुध्दा या मंदिरात ठेवल्या गेल्या आहेत. निसर्गरम्य वातावरणाची जोड या परिसराला अधिक भावणारी आहे. श्रध्दास्थान ठरलेल्या या मंदिराच्या परिसरात बेलेश्वर महादेव मंदीर व महात्मा पालसिध्द स्वामींचा मठ सुध्दा भक्तांच्या ठायी ठायी भावणारे आहे.
त्याशिवाय येथे असलेला तुराबुल हा पीर नामक दर्गा हिंदु-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक मानले जाते. फेब्रुवारी महिन्यातील दोन तारखेपासून तब्बल बारा तारखेपर्यंत येथे मोठा उरुस भरला जातो. या दरम्यान निघणाऱ्या संदलरुपी मिरवणूकीत सर्वधर्मीय लोकांचा तांतां असतो. जत्रेच्या स्वरुपात याठिकाणी निरनिराळ्या प्रकारची दुकाने,. हॉटेल्स, विरंगुळा करणारी साधणे, अथवा खेळांची दुकाने येत असतात. सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने यात सामील होत असतात.
परभणी शहर व जिल्ह्याची ऐतिहासिक, पौराणिक, सांस्कृतिक व भौगोलिक स्थिती विषद करण्यामागचा एकमेव उद्देश म्हणजे एवढं सारं असूनही निजामकालीन हा जिल्हा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव साजरा करीत असतांना सुध्दा विकासापासून कोसो दूर राहिला असल्याचे निदर्शनास आणून देणे हे मी माझे परम कर्तव्य समजतो.
वरील नमूद सर्वच महिला अधिकारी वर्गांनी आपली सर्वंकष बुध्दी पणाला लावून, प्रयत्नांची पराकाष्ठा करुन परभणी शहर व जिल्हा विकासाचे स्वप्न सत्यात उतरावे हीच माझी मनोमन इच्छा आहे व भविष्यातही राहील एवढे नक्की. येथील विविध राजकीय पक्षांची नेते मंडळी व त्यांचे राजकीय विचार हे भलेही काही जरी असले तरी त्यांना विकासाची एकत्र आणून वंचित राहिलेला विकास त्यांच्या मनात रुजवला जावा, गळी उतरवले जावे ही माझी या सर्व महिला अधिकाऱ्यांना विनम्र प्रार्थना आहे. वरील नमूद अधिकारी महिला रणरागिणींसोबत आणखी बऱ्याच अधिकारी महिला येथील विविध पदांवर कार्यरत आहेत, ज्यांचा आम्ही या क्षणी उल्लेख करुन शकलो नाही, तो यथावकाश नक्कीच करु, यात शंकाच नाही. तथापि त्यांचेही या विकास काही नक्कीच योगदान मिळावे ही त्यांनाही प्रार्थना राहील.
त्यासाठीच ‘जिल्हा परभणी, महिला कारभारिणी’ हे शीर्षक देऊन ‘परभणी जिल्ह्याच्या विधायक विकासाची बागडोर महिला अधिकाऱ्यांच्या हाती’ हे दुसरे पूरक शीर्षक देत यातली आणखी एक उणीव म्हणजे जिल्हा पालकमंत्री पदी सुध्दा एका कर्तबगार अशा महिला मंत्र्यांचीच नियुक्ती करुन वरील सर्व महिला अधिकाऱ्यांना प्रोत्साहन दिले जावे अशी विनंती सुध्दा महाराष्ट्र शासनाकडे या माध्यमातून मी केली आहे. निश्चितच या मागणीचा विचार शासनाकडून केला जाईल, असा आशावाद बाळगायला हरकत नसावी. यासाठी समस्त महिला अधिकारी व राजकारणी मंडळींनी सुध्दा केली तर याचा सहाभुतीने शासन विचार करु शकेल असे वाटल्यास वावगे ठरु नये.
मागील कांही कालावधीपासून आंचल गोयल ह्या जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी अगदी निक्षून सांभाळीत आहेत. प्रसंगी शेतकऱ्यांच्या बांधावर ही त्या जात असतात. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून तु.एम्.नंदेश्वर या न्यायदानाचे कर्तव्य पार पाडीत आहेत. परभणी शहराच्या सर्वांगीण विकास साधला जावा यासाठी तृप्ती सांडभोर या महापालिका आयुक्त म्हणून निष्ठेने जबाबदारी सांभाळत आहेत तर शिवानंद टाकसाळे यांच्या बदलीनंतर हंगामी स्वरूपात का होईना परंतु जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार रश्मी खांडेकर यांना सांभाळावा लागत आहे. कदाचित त्यांची ही सेवा यापुढेही कायम राहू शकेल यात शंकाच नसावी. या व अशा अनेक महिला अधिकारी म्हणून परभणीच्या विधायक विकासाचा व कायदा व सुव्यवस्थेबरोबरच न्यायदानाचा महारथी अगदी यशस्वीपणे साकार करणार आहेत, यात तिळमात्र शंकाच नसावी.
“मेणाहून मऊ आणि वज्राहून कठोर” अशी देणगी स्त्रीला असते. सामर्थ्य, श्रध्दा, शील, सहनशीलता, सेवा मातृत्व हे गुण अंगी असणाऱ्या विविध क्षेत्रात आपला ठसा उमटविलेल्या महिलांची ओळख प्रतिभा हंप्रस यांनी ‘भारतातील कर्त्ववान स्त्रिया’ यातून करुन दिली आहे.
हिंदवी स्वराज्य स्थापनेचे बाळकडू छत्रपती शिवाजी महाराज यांना देऊन तसे संस्कार करणाऱ्या राजमाता जिजाऊ, घरातील माणसाच्या मृत्यूचे दु:ख बाजूला सारून राज्यकर्त्यांच्या भूमिकेतून प्रजाहिताची कामे करणाऱ्या पूण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, पती निधनानंतर शहेनशहा अकबराच्या सैन्याला टक्कर देणारी राणी दुर्गावती, तसेच चांदबीबी, तसेच झाशीची राणी यांचे अतुलनीय युध्दकौशल्य, लहानपणापासून आकाशात भरारी मारण्याचे पाहिलेले स्वप्न साकार करणारी कल्पना चावला, सुनीता विल्यम्स, कर्मठ सामाजिक वातावरणात वैद्यकीय शिक्षण घेऊन पहिल्या महिला डॉक्टर झालेल्या आनंदी गोपळ जोशी, जगाला दु:खातून बाहेर काढून आनंद वाटणाऱ्या माता अमृतनंदमयी, महिला शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीबाई फुले यासारख्या व अशा अनेक झुंजार, लढवय्या, शूर महिलांची उदाहरणे देऊन आपल्याला त्यांचा आदर्श आजही डोळ्यासमोर तरळतांना दिसत असतो. मग त्याच आदर्शवादी, कर्मठपणाच्या भावनेने वरील नमूद सर्व महिला अधिकाऱ्यांकडे बघितले आणि त्यांच्या हिम्मतबाज कर्तव्याला दाद देऊन सदोदीत सहकाऱ्यांची भावना जोपासली गेली तर नक्कीच पुरुषी कर्तबगारीला ही सेवा वाटावा अशी सेवा त्यांच्या हातून निश्चितच घडली जाईल असा विश्वास ठेवायला मुळीच हरकत नसावी.
निजामकालीन परभणी शहर व जिल्ह्याला सुध्दा ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक असा वारसा लाभलेला आहे. परभणी शहर हे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. मुंबई -काचिगुडा, परळी, बॅंगलोर या दरम्यानच्या रेल्वे स्थानकांना जोडणारे व जुळले गेलेले स्थानक म्हणजे परभणी. याच परभणी शहरातून जो राष्ट्रीय महामार्ग जातो, तो रेल्वे व्यतिरिक्त अन्य लहान -मोठी गावे, शहरे जोडणारा ठरला गेला आहे. येथे निवास करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला परभणीकर म्हणून अभिमानाने संबोधले जाते. प्राचिन काळी परभणी शहर प्रभावती नगर म्हणून ओळखले जात असे. परभणी शहराला प्रभावती नगरी हे नाव प्रभावती देवींच्या प्राचिन मंदीराच्या अस्तित्वामुळे देण्यात आले होते. ‘प्रभावती’ या शब्दाचा अर्थ म्हणजे देवी पार्वती व लक्ष्मी असा होतो. परभणी शहराचे सध्याचे नाव हे याच नावाचे भ्रष्ट स्वरुप असल्याचे संबोधले जाते.