
दैनिक चालू वार्ता हिमायतनगर प्रतिनिधी -राम चिंतलवाड
हिमायतनगर: हिमायतनगर तालुक्यातील मौजे मंगरुळ ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी ग्रामपंचायत सदस्य संतोष आंबेकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी अभुतपुर्व मते मिळवून विजय मिळवला होता. ही निवड ग्राम विकास अधिकारी श्री. पोपलवार साहेब व विद्यमान सरपंच दिव्या जिवन जैस्वाल यांच्या मार्गदर्शन आणि आदेशाखाली करण्यात आली. या निवडीला सर्व ग्रामपंचायत सदस्य सौ. प्रतिभा बालाजी पावडे,लताबाई शिवाजी बोरकर,शेशिकलबाई मारोती सोमनवाड, साहेबराव घमेवाड,रमेश सादलवाड,आनंदा पेंटेवाड यांनी एकमताने सहमती दर्शवली.
यावेळी सोसायटी चेअरमन जनार्दन ताडेवाड, उपचेअरमन प्रविण जाधव, केरबा सुदेवाड,जीवन जैस्वाल,सुभाष जललवाड, संचालक बालाजी पावडे, मारोती सोमनवाड,संचालक दिनेश राठोड,सुरेश गुंठेवाड,विकास बोरकर,गजानन रुद्रबोईनवाड,गजानन कुंजरवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यासोबतच गावकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या गावाला एक कार्यकुशल नेता उपसरपंच म्हणुन मिळाला अशी भावना गावकर्यांकडुन व्यक्त होत आहे.