
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
नांदेड : – महाराष्ट्रातील प्राधान्य कुटुंब व अंत्योदय अन्न योजनेतील पात्र सुमारे १ कोटी ६२ लाख शिधावाटप पत्रिका लाभार्थींमधील सुमारे ७ कोटी नागरिकांना दिवाळीनिमित्त वाटप करण्यात येणार असुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयामध्ये १ किलो साखर, १ किलो रवा, १ किलो चणाडाळ व १ लिटर पामतेल या चार वस्तूंची किट लोहा तालुक्यातील पांगरी येथील स्वस्त धान्य दुकानदार तथा पांगरीचे उपसरपंच प्रा माधव पाटील यांच्या हस्ते पांगरी येथील दैनिक चालु वार्ताचे उपसंपादक गोविंद पाटील पवार शिवसेना दक्षिणचे संघटक सुदाम पा बुद्रुक शालेय समितीचे उपाध्यक्ष गणेश पा बुद्रुक विलास सुर्यवंशी संतोष बुद्रुक माधव जाधव बळीराम तानाजी बुद्रुक अंकुश बुद्रुक बाबासाहेब गायकवाड , यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
राज्य शासनाने सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये सामान्य कुटुंबांतील नागरिकांना दिवाळी सणानिमित्त सरकारच्या माध्यमातून मदत करण्यासाठी अल्पदरात दिवाळी फराळासाठी लागणारी किट पांगरी येथील स्वस्त धान्य दुकानात देण्यात आली. यामध्ये एक किलो रवा, एक किलो चणा डाळ, एक किलो साखऱ आणि तेल हे चार पदार्थ शंभर रुपयात देण्यात आले. यामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या चेहऱ्यावर हसु तर दिवाळीचा फराळ शंभर रुपयांत खमंग होण्याचे चिञ यावेळी दिसुन आले.