
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
वडूज पोलीस स्टेशनच्या स्टेट बँक ऑफ इंडिया या परिसराच्या आवारांमध्ये आशा दीपक तुपे यांची पर्स वडूज येथील स्टेट बँक ऑफ इंडिया समोर हरवली. या पर्समध्ये अर्ध्या तोळ्यांचे मनी मंगळसूत्र, रोख रक्कम ५ हजार ५०० रुपये व महत्त्वांची कागदपत्रे होती. ही पर्स सुशीला कृष्णा घार्गे या वयोवृद्ध महिलेस मिळाल्यांने त्यांनी आपला प्रामाणिकपणा दाखवत पर्स वडूज पोलिसांकडे दिली. वडूज पोलीस ठाण्यांतील पोलीस अंमलदार अश्विनी देशमुख व शिवाजी खाडे यांनी हरवलेल्या पर्स मालकाचा शोध घेवुन त्याची पर्स परत केली.तसेच वडूज पोलीस ठाण्यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराजे देशमुख यांनी पर्स देणाऱ्या महिलेचे प्रामाणिकपणाबद्दल कौतुक करीत. वडूज परिसरांमधून प्रामाणिकपणाबद्दल महिलेचे सर्वत्र कौतुक होत आहे.