
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कलंबर :- कलंबर खुर्द ता..लोहा येथे भव्य दिव्य दोन महान संतांचे मंदिर बांधण्यात येत आहे.या बांधण्यात येणाऱ्या मंदिराची पाहणी व दिवाळी निमित्त सदिच्छा भेट देऊन श्री.संत योगीराज निवृत्ती महाराज व श्री.संत मोतीराम महाराज यांचे दर्शन घेतले.मंदिर कमेटीच्या वतीने श्री.सुरेश पाटील घोरबांड सर यांनी दैनिक चालू वार्ता पुणे चे मुख्य संपादक श्री.डि.एस.लोखंडे पाटील यांच्या सत्कार करण्यात आला.यावेळी शिवाजीनगर पुणे पत्रकार श्री.दत्ता पवार पाटील नंदनवनकर , पुणे पत्रकार श्री.व्यंकटेश ताटे पाटील सावरगावकर , मराठवाडा विभाग उपसंपादक श्री.ओमकार लव्हेकर सर, कंधार तालुका पत्रकार माधवराव गोटमवाड सर, कंधार तालुका ग्रामीण पत्रकार श्री.बाजीराव पाटील कळकेकर सर, उस्माननगर सर्कल पत्रकार श्री.लक्ष्मण कांबळे सर , श्री.सोपान पाटील घोरबांड, श्री.बाबजी पाटील घोरबांड, श्री.प्रभाकर पाटील घोरबांड आणि संस्थानचे श्री.सुरेश पाटील घोरबांड सर उपस्थित होते.यावेळी मुख्य संपादक साहेबांनी श्री.संत योगीराज निवृत्ती महाराज हे आमच्या वडिलांचे कुलदैवत आहे.त्यामुळे मी माझ्यापरीने कोणतीही मदत मंदिरासाठी करील असे सांगितले . त्यांनी यावेळी महाराजांच्या अनेक लिला व प्रसंग सांगितले.वै.शंकर महाराज घोरबांड यांनी ग्रंथाची रचना केली असून त्यांचे नातू सुरेश घोरबांड सर यांनी पोथीचे प्रकाशन केले आहे व मंदिर निर्माण कार्य हाती घेतले असून ते कार्य अत्यंत चांगले असल्याचे त्यांनी सांगितले .