
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
कंधार :- कंधार तालुक्यातील अठरा गावात आत्महत्याग्रस्त कुटुंबांना नाम फाउंडेशनच्या वतीने साडी, चोळी, मिठाई, चिवडा शकरपाळे उटणे, साबण वाटप करण्यात आले.पेठवडज, कल्लाळी,शेल्लाळी,गुटेवाडी,ढाकूनाईक तांडा,घोडज,खुड्याचीवाडी,मंगलसांगवी,बारूळ, चिंचोली,सिरसी बु येथे जाऊन नाम फाउंडेशन नांदेड जिल्ह्याचे डॉ.अशोक बेलखोडे,प्रा.डाॅ.बालाजी कोंम्पलवार श्री.भाऊराव मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊंची भेट देऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली.यावेळी कंधार तालुका समन्वयक पांडुरंग कंधारे, व्यंकटी जाधव, गजानन जाधव,हरीश्चंर्द राजे, श्रीराम कुलकर्णी, पंजाब राजे, राजेश्वर डावकोरे, सुनील चालीकवार ,बाबु हराळे, व्यंकटी ईटकापल्ले यांच्या सहकार्याने भाऊंची भेट दिवाळी निमित्त देण्यात आली .इ.स.२०१५ पासून नाम फाउंडेशनच्या वतीने साडी चोळी मिठाई देण्यात येते.